बाॅलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री हे अभिनयाच्या माध्यमातून तगडी कमाई करतात हे सर्वांनाच माहिती आहे. परंतू असे बरेच अभिनेते आहेत जे फक्त अभिनयाच्या माध्यमातूनच नाही तर इतरही काही बिझनेसच्या माध्यमातून करोडोंची कमाई करतात.
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा फक्त अभिनयातूनच नाही तर त्याचा एक कपड्यांचा ब्रांड असून देशभरात कपडे विकले जातात. मोठ्या शहरांमध्ये याचे अनेक शोरूम देखील आहेत.
बाॅलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन देखील अभिनयाशिवाय शेअर मार्केटमधून मोठी कमाई करतात. शेअर मार्केटमध्ये अमिताभ बच्चन यांचा मोठा पैसे लावलेला आहे.
बाॅलिवू़ड अभिनेता अक्षय कुमार याचे एका वर्षाला सर्वाधिक चित्रपट रिलीज होतात. फक्त चित्रपटातूनच नाही तर अक्षय कुमार याचे स्वत: चे ऑनलाइन शॉपिंग चॅनल असून यातून तो बक्कळ अशी कमाई करतो.
शाहरुख खान हा देखील अनेक बिझनेस करतो आणि चांगली कमाई करतो. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने तूफान कमाई केलीये.