तळकोकणात विदेशी पाहुण्यांचे आगमन, पक्षांचे थवे अन् निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी

| Updated on: Dec 02, 2024 | 2:12 PM

Konkan Tourism: महाराष्ट्रातील स्वित्झर्लंड म्हणून कोकणाची ओळख झाली आहे. त्यामुळे कोकणात देशविदेशातील पर्यटकांची गर्दी असते. प्रत्येक ऋतूत कोकणातील निसर्गाचा वेगवेगळा आनंद घेता येतो. हिवाळ्यात विदेशी पक्ष्यांचे कोकणात आगमन झाले आहे. त्याचबरोबर पर्यटक आणि अभ्यासकांची गर्दी सुरु झाली आहे.

1 / 5
थंडीची चाहुल लागताच कोकणातील जलाशयांवर स्थलांतरित पक्षी डेरेदाखल होत असतात. तळकोकणात विदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे पर्यटकांना पर्वणी ठरत आहे. दरवर्षी पक्षीमित्रांना आणि पर्यटकाना पाहुण्या पक्ष्यांच्या आगमनाची उत्सुकता असते.

2 / 5
कोकण किनारपट्टीवर सीगल पक्षी आले आहेत. या पाहुण्यांनी देवबाग, मालवण, भोगवे, दांडी-मालवण समुद्रकिनारे गजबजले आहेत. देवबाग किनाऱ्यावर रपेट मारताना सीगल पक्ष्यांचे थवे दिसू लागल्याने पर्यटकांना ते आकर्षण ठरत आहे.

3 / 5
पक्ष्यांचे थव्यांची छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. मालवण, देवबाग, भोगवे किनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. या पर्यटकांसाठी सीगल पक्षी म्हणजे पर्वणी ठरत आहे.

4 / 5
हवाई मार्गे हजारो किलोमीटरचा प्रवास करून सीगल पक्षी कोकणात आले आहे. त्यामुळे आधीच निसर्गाने भरभरुन दान दिलेल्या कोकणातील सौदर्यं अधिकच बहरले आहे. बोचऱ्या थंडीत निसर्गाचा आनंद पक्षीप्रेमी घेत आहेत.

5 / 5
युरोपातून सीगल पक्षी दरवर्षी हिवाळ्यात भारतात येत असतात. कोकणातील समुद्र किनारी हे पक्ष थांबतात. दोन हजार किलो मीटरचा प्रवास ते करतात. पक्ष्यांमध्ये यांचे आयुष्य दीर्घ आहे. हे पक्ष जवळपास 49 वर्ष जिवंत राहतात.