शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाची मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. आता नुकताच शाहरुख खान याच्या पठाणबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठे भाष्य केले.
अरविंद केजरीवाल शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाचे काैतुक करताना दिसले. अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी अजून पठाण हा चित्रपट बघितला नाही. मात्र, त्याच्याबद्दल खूप काही चांगले ऐकले आहे.
केजरीवाल म्हणाले, चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे शाहरुख खान म्हणतो की, कोणी मत मागायला आले तर धर्माच्या नावावर मतदान अजिबात करू नका. जातीच्या नावावर मतदान करू नका.
जेव्हा तुम्हाला कोणी मते मागायला येईल, तेव्हा त्याला विचारा की, माझ्या मुलांना चांगले शिक्षण देणार का? माझे कुटुंब आजारी असल्यास चांगल्या उपचाराची व्यवस्था करणार ना?.
शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठा धमाका केला. शाहरुख खान याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे.