IPL ने कुठल्या प्लेयरला गरजेपेक्षा जास्त भाव दिला? 12 सीजनमधून 95 कोटी, अजूनही तो कमावतोय पैसा
आयपीएलच्या 17 वर्षात आतापर्यंत अनेक टॅलेंटेड खेळाडू मिळाले. काहींनी अपेक्षापेक्षा जबरदस्त प्रदर्शन केलं. काहींनी भ्रमनिरास केला. काही खेळाडू खूप चर्चेत राहिले. पण प्रदर्शन तसं नव्हतं. एक असा प्लेयर आहे, जो आयपीएलमधून अजूनही भरपूर पैसा कमावतोय.
-
-
IPL च्या 17 सीजनच्या इतिहासात नेहमी चर्चा होते की, कुठला खेळाडू सर्वात जास्त चांगला होता. विराट कोहली, एबी डिविलियर्स, ख्रिस गेल, एमएस धोनी सारख्या दिग्गजांची नाव यामध्ये येतील.
-
-
कुठल्या खेळाडूने आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई केली, चर्चेत होता. पण त्याने तसं प्रदर्शन केलं नाही, तेव्हा सुद्धा अनेक नाव येतील.
-
-
टीम इंडियाचा माजी विकेटकीपर पार्थिव पटेल आयपीएलच्या वेगवेगळ्या टीममधून खेळलाय. त्याने एका प्लेयरच नाव घेतलय, ज्याच्या क्षमतेबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं.
-
-
ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल ऑलराऊंडर आहे. मागच्या 12 सीजनपासून आयपीएलमध्ये खेळतोय. आतापर्यंत त्याने 95 कोटी रुपये कमावले आहेत. पार्थिव पटेलने एका टि्वटमध्ये ग्लेन मॅक्सवेलला ओव्हररेटेड खेळाडू म्हटलय. “ग्लेन मॅक्सवेल आयपीएल इतिहासातील सर्वाधिक ओवररेटेड खेळाडू आहे”
-
-
GT विरुद्ध विजयाची स्थिती असताना RCB ने अचानक 6 विकेट गमावले, त्यानंतर पार्थिक पटेलने हे टि्वट केलं. मॅक्सवेल 4 रन्सवर आऊट झाला.