Tesla Model 3: भारतात टेस्ला इलेक्ट्रिक गाड्यांची एन्ट्री झालं तरी सर्वाधिक पसंती ही मॉडेल 3 मिळू शकते. ही टेस्लाची इतर गाड्यांच्या तुलनेत स्वस्त सेडान कार आहे. बजेटच्या हिशेबाने सर्वाधिक पसंती या गाडीला मिळू शकते. फुल चार्ज केली असता ही गाडी 550 किमी अंतर कापू शकते. सध्या कंपनी फेसलिफ्ट वर्झन मॉडेल 3 हायलँडवरही काम करत आहे. (Photo: Tesla)
Tesla Model X: मॉडेल एक्स ही टेस्लाची हाय परफॉर्मन्स इलेक्ट्रिक कार आहे. पूर्ण चार्जवर ही गाडी 565 किमी अंतर कापू शकते. या गाडीमध्ये 75 किलोवॅट बॅटरी पॅक पॉवर आहे. या गाडीमध्ये 17 इंच इंफोटेनमेंट स्क्रिन आणि सेल्फ ड्रायव्हिंग फीचर्स दिले आहेत. (Photo: Tesla)
Tesla Model Y: मॉडेल वाय ही देखली टेस्लाची जबरदस्त कार आहे. या गाडीत दोन बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. 67 किलोवॅट आणि 81 किलोवॅट पर्यायासह ही गाडी खरेदी करू शकता. ही गाडी पूर्ण चार्जवर 530 किमी अंतर कापते. या गाडीला अमेरिका आणि चीनमध्ये खूप पसंती मिळत आहे. (Photo: Tesla)
Tesla Semi: टेस्लाच्या ट्रकची जोरदार चर्चा आहे. इलेक्ट्रिक ट्रकला बाजारात प्रचंड मागणी आहे. यामुळे भारतात ट्रान्सपोर्ट सेक्टर मोठा बदल होऊ शकतो. वॉलमार्ट आणि पेप्सिकोसारख्या कंपन्यांनी हा ट्रक आधीच बूक केला आहे. सिंगल चार्जवर हा ट्रक 800 किमी अंतर कापतो. (Photo: Tesla)
Tesla Cybertruck: टेस्लाची सायबरट्रकची जोरदार चर्चा आहे. या गाडीबाबत कारप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 2019 मध्ये या गाडीचं सादरीकरण करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर या गाडीच्या प्रोडक्शनमध्ये अनेक अडचणी आल्या. हा सायबरट्रक 100 किलोवॅटसह येते आणि 800 किमी रेंज देते. (Photo: Tesla)