Marathi News Photo gallery Asha bhosle announces grand daughter zanai bollywood debut with pride of bharat chhatrapati shivaji maharaj
आशा भोसलेंची नात जनाई बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज; साकारणार ऐतिहासिक भूमिका
जनाईचं सौंदर्य हे कोणत्याही अभिनेत्रीला, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स यांनाही टक्कर देणारं आहे. जनाई ही 20 वर्षांची असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि त्याचसोबत उद्योजिकासुद्धा आहे.
1 / 5
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. निर्माता संदीप सिंह यांच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटातून ती अभिनयक्षेत्रात पहिलं पाऊल टाकणार आहे. या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी सईबाई भोसलेंची भूमिका साकारणार आहे.
2 / 5
आशा भोसले यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. "मी माझी लाडकी नात जनाई भोसलेला आगामी 'द प्राइड ऑफ इंडिया : छत्रपती शिवाजी भोसले' या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीशी जोडताना पाहून खूप खुश आहे. मला खात्री आहे की ती चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप सोडेल", अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला.
3 / 5
संदीप सिंह यांनीसुद्धा जनाईच्या डेब्युबद्दल आनंद व्यक्त केला. "जनाईला लाँच करताना मला खूप आनंद होत आहे. ती एका मोठ्या कुटुंबाचा भाग आहे. तिला जन्मत:च उत्तम आवाजाची देणगी मिळाली आहे. त्याचप्रमाणे तिला संगीताचीही आवड आहे. ती खूप उत्तम डान्सर आणि परफॉर्मर असल्याचं फार क्वचित लोकांना माहीत आहे", असं ते म्हणाले.
4 / 5
अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही इन्स्टाग्रामवर जनाईला शुभेच्छा दिल्या आहेत. जनाईसोबतचा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, 'माझी बहीण चित्रपटसृष्टीत सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी येतेय. तिला माझ्याकडून शुभेच्छा!'
5 / 5
'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' हा चित्रपट अत्यंत भव्य स्वरुपात बनवला जाणार आहे. 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.