Marathi News Photo gallery Ashadhi ekadashi 2021 pandharpur vitthal rukmini temple attractive decoration for this special occasion
Ashadhi Ekadashi 2021 : चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, पंढरपुरातील विठूरायाचं रुप खुललं!
दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल मंदिरात आषाढी अर्थात देवशयनी एकादशीनिमित्त फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजवण्यासाठी तब्बल साडेचार टन फुलांचा वापर करण्यात आला होता.
1 / 9
मोठ्या थाटामाटात जल्लोषात साजरी केल्या जाणाऱ्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचं सावट आहे. सुंदर तें ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनियां, या अभंगाप्रमाणे पंढरपुरातील विठूरायाचे रुप आज खुलून निघालं आहे.
2 / 9
दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल मंदिरात आषाढी अर्थात देवशयनी एकादशीनिमित्त फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
3 / 9
विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजवण्यासाठी तब्बल साडेचार टन फुलांचा वापर करण्यात आला होता.
4 / 9
पुण्यातील विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी ही सजावट केली आहे.
5 / 9
विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजवण्यासाठी झेंडू, अष्टर, अंथुरियम, शेवंती, हाय डेंजर, कार्नेशन, गुलाब, ऑर्किड, कामिनी, जीपसो ,जरबेरा यांसह विविध फुलांचा वापर करण्यात आला आहे.
6 / 9
यावेळी विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी, संत नामदेव पायरी या ठिकाणी सजावट करण्यात आली.
7 / 9
गेल्या कित्येक वर्षापासून भारत भुजबळ हेच आषाढी एकादशी दिवशी संपूर्ण मंदिरात फुलांनी सजावट करत आहेत.
8 / 9
दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली.
9 / 9
यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यंदा मानाचा वारकरी म्हणून विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांना मान मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोलते दाम्पत्याचा सत्कार केला गेला.