वर्षभरातील 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशी खूप महत्वाची असते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणतात.
या एकादशीला महाएकादशीला म्हणून देखील ओळखलं जातं. वारकऱ्यांसाठी या दिवसाचं महत्त्व फार मोठं असतं. वारीची परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे.
महाराष्ट्रात लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठूरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात. तसेच या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजाही होते.
आषाढी एकादशी असल्यामुळे तुम्ही देखील उत्साहाने आणि आनंदाने साजरी करा. दारात सुंदर, सोप्या रांगोळ्या काढा आणि घराचं सौंदर्य वाढवा.
फार कमी वेळात तुम्ही या रांगोळ्या काढू शकता. शिवाय घराबाहेर जागा कमी असल्यास देखील फुलांची सुंदर रांगोळ तुम्ही काढू शकता.
दारात रांगोळी काढणं फार शुभ मानलं जातं. रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे.