महाराष्ट्रातील प्रेक्षक बुद्धिमान आणि खडूस; ‘महाराष्ट्र भूषण’ स्वीकारताना काय म्हणाले अशोक सराफ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आलं. यावेळी निवेदिता सराफ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
1 / 8
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार तसंच अशोक सराफ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदित सराफ उपस्थित होत्या.
2 / 8
महाराष्ट्रातील प्रेक्षक कोणाला डोक्यावर उचलून घेतील आणि कोणाला आपटतील हे सांगता येणार नाही. त्यांच्यासमोर अभिनय करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. हा प्रेक्षक चोखंदळ, बुद्धिमान आणि तेवढाच खडूस आहे, असं मत अशोक सराफ यांनी यावेळी व्यक्त केलं.
3 / 8
राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने गुरुवारी महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची यापूर्वीची यादी फार मोठ्या माणसांची आहे, या यादीत मला आज राज्य शासनाने नेऊन ठेवलंय, त्याबद्दल मी ऋणी आहे, असंही अशोक सराफ यावेळी म्हणाले.
4 / 8
अशोक सराफ यांना हा पुरस्कार प्रदान करण्याचा दिवस अमृताहून गोड दिवस आहे. त्यांच्या अनेक अविस्मरणीय भूमिका महाराष्ट्राने पाहिल्या आहेत, 'अष्टपैलू' अशोक सराफ हे मराठी मातीतील अस्सल हिरा आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
5 / 8
राज्याच्या सर्वोच्च नागरी सन्मान 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा 'गानसम्राज्ञी लता मंगेश पुरस्कार' ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना यावेळी प्रदान करण्यात आला.
6 / 8
ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2020 साठी अभिनेते रवींद्र महाजनी (मरणोत्तर) यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनीने स्वीकारला.
7 / 8
महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि एक नंबरचा पुरस्कार मला प्रदान केलात त्याचा मला खरोखरंच आनंद होत आहे. कारण ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो त्या माझ्या कर्मभूमीत माझा सत्कार केला, यापेक्षा कोणती मोठी गोष्ट नाही, अशा शब्दांत अशोक सराफ यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
8 / 8
माझी पन्नास वर्षांची कारकिर्द झाली, आता मला आठवतही नाही की कोणासोबत काय काम केलं. एक मात्र आहे की या प्रवासामध्ये ज्यांनी ज्यांनी मला मदत केली, यामध्ये दिग्दर्शक, माझे सहकलाकार, सोबत काम करणारे कामगार यांनी जर मला पाठिंबा दिला नसता तर मला वाटत नाही की मी या पदावर पोहोचलो असतो. शेवटी तुम्ही सर्व प्रेक्षक ही सर्व त्यांचीच किमया असल्याचंही अशोक सराफ यांनी सांगितलं.