Assembly Election 2023 | काँग्रेसच्या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटरने जखमेवर मीठ चोळले

| Updated on: Dec 03, 2023 | 4:09 PM

Assembly Election 2023 | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विविध पक्ष मैदानात उतरले होते. चार पैकी तीन राज्यांची रविवारी मतमोजणी झाली. त्यापैकी तीन राज्यात भाजपची सरकार सत्तेवर आली. काँग्रेसला तेलंगणात सत्ता मिळाली. भारतातील या निवडणुकीची चर्चा पाकिस्तानात झाली...

1 / 5
पाच राज्यांपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. या निवडणूक निकालातून एक्झिट पोलही फोल ठरला. या निवडणूक निकालाची चर्चा देशभर झाली. भारतात निवडणूक प्रचाराचे जे मुद्दे होते, त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले.

2 / 5
एकीकडे भारतात वर्ल्डकपचा थरार सुरु असताना पाच राज्यातील निवडणुकीचा थरार सुरु होता. या निवडणुकी दरम्यान वर्ल्डकपची फायनल झाली. फायनलमध्ये भारतीय संघ पोहचला होता. संघाच्या या दमदार कामगिरीमुळे फायनल सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते.

3 / 5
अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. त्यानंतर निवडणूक प्रचारात राहुल गांधी यांनी 'पनौती' शब्द चर्चेत आणला. राहुल गांधी यांनी म्हटले होते की, आपले मुले चांगले खेळत होती. प्रत्येक सामना जिंकत होती. परंतु 'पनौती' गेल्यामुळे भारतीय संघाचा पराभव झाला.

4 / 5
चार राज्यांपैकी तीन राज्यांच्या निवडणुकीचे निकाल रविवारी आले. त्यात तीन राज्यांत भाजपला यश मिळाले. त्यातील दोन राज्य काँग्रेसकडे होती. या पराभवावर पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरिया याने ट्विट केले आहे.

5 / 5
 दानिश कनेरिया याने 'पनौती' कोण? असा सवाल केला आहे. दानिश कनेरियाने ट्विट करून हा सवाल केला आहे. चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा 'पनौती' हा शब्द ट्रेंड झाला आहे. #राहुल_गाँधी_पनौती_है, मोदी मैजिक.