नाश्त्यात ‘हे’ पदार्थ चुकूनही खाऊ नयेत, होईल मोठं नुकसान!
सकाळी उठल्यानंतर सकारात्मक सुरुवात व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी लोक आधी चहा पितात. जेणेकरून त्यांना फ्रेश वाटेल. चांगला नाश्ता केल्याने ऊर्जा मिळते आणि दिवसही मग छान जातो. ब्रेकफास्टमध्ये चांगले ऑप्शन्स असतील तर आरोग्यासाठी ते कधीही उत्तम! काय पदार्थ नाश्त्यात अजिबातच खाऊ नयेत ते बघुयात...
1 / 5
सकाळी उठल्यानंतर सकारात्मक सुरुवात व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी लोक आधी चहा पितात. जेणेकरून त्यांना फ्रेश वाटेल. चांगला नाश्ता केल्याने ऊर्जा मिळते आणि दिवसही मग छान जातो. ब्रेकफास्टमध्ये चांगले ऑप्शन्स असतील तर आरोग्यासाठी ते कधीही उत्तम!
2 / 5
असंही म्हटलं जातं की नाश्ता हा राजासारखा करावा. आपण काय खातो याला फार महत्त्व आहे त्यामुळे दिवसाची सुरुवात चांगलं काहीतरी खाऊन करावी. काय पदार्थ नाश्त्यात अजिबातच खाऊ नयेत ते बघुयात
3 / 5
जर तुम्ही सकाळी ब्रेकफास्टमध्ये पॅनकेक्स खात असाल तर आजच सोडून द्या. पॅनकेक्स आणि वेफर्स चुकून सुद्धा नाश्त्यासाठी खाऊ नयेत. पॅनकेक्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स खाल्ल्याने तुमच्या शरीराची ऊर्जा कमी होऊ शकते. हा नाश्त्यासाठी अजिबात चांगला पर्याय नाही.
4 / 5
बऱ्याच लोकांचा दिवस चहाने सुरु होतो. रिकाम्या पोटी चहा पिणं आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. तुम्ही फळे खाऊन किंवा व्यवस्थित नाश्ता करून चहा घेऊ शकता.
5 / 5
आजकाल बाजारात वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रेकफास्ट सिरीयल उपलब्ध आहेत. हे पॅकेज्ड फूडचा एक भाग असल्याने आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. यात वेगवेगळे फ्लेवर्स सुद्धा मिळतात, खायला उत्तम लागत असलं तरी आरोग्यासाठी फारसं चांगलं नसल्याने हे न खाण्याचा सल्ला दिला जातो.