Weight Loss | वजन कमी करायचं असेल तर ‘या’ सवयी आजच टाळा!
वजन आणि सवयी यांचा परस्परांशी खूप महत्त्वाचा संबंध आहे. वजन कमी करायचं असेल तर काही सवयी लावणं आणि काही सवयी दूर करणं खूप गरजेचं आहे. या सवयींमध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरापर्यंत झोपणे. जेवण करून झाल्यावर सुद्धा पुन्हा काहीतरी रात्री उशिरा खात बसणे. अशा अनेक सवयी आहेत. काय आहेत या सवयी? जाणून घेऊया...
1 / 5
अनेकांना वजन कमी करायचं असतं. वजन कमी करताना ते फक्त दिवसाच्या रुटीनकडे लक्ष देतात. दिवसा सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जातात पण रात्री त्या फॉलो केल्या जात नाहीत. खरं तर वजन कमी करणे आणि रात्रीच्या वेळच्या सवयींचा फार जवळचा संबंध आहे. कोणत्या सवयी आहेत त्या ज्या दूर करायला हव्यात?
2 / 5
खराब आहार आणि जीवनशैलीमुळे बहुतांश लोक लठ्ठ होत आहेत. अशावेळी लोक जिम जॉइन करून इंटेन्स वर्कआउट करतात. पण अनेकदा लोकांना अपेक्षित परिणाम मिळत नाही. आजकाल लोक डायटिंग ट्रेंड जास्त फॉलो करत आहेत. लोक त्यांचे वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीयुक्त आहार देखील घेत आहेत.
3 / 5
रात्री जेवण झाल्यानंतर सुद्धा काही लोकांना भूक लागते. भूक लागली म्हणून काहीही खाऊन कसं चालेल? यात तुम्ही ड्रायफ्रुट्स, फळे, ज्यूस असं काहीतरी खाऊ शकता पण काही लोक बर्गर, कुरकुरे, तळलेले पदार्थ, जंक फूड हे सगळं खात बसतात. रात्रीच्या वेळी हे खाणं म्हणजे आजारांना निमंत्रण देणं आहे.
4 / 5
स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा लॅपटॉप सारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्याची सवय. झोपेच्या वेळी लोक फोन खेळत बसतात किंवा लॅपटॉप वर काम करत बसतात. ही सवय तुमच्या झोपेत व्यत्यय आणू शकते. झोप न झाल्यास हार्मोनल असंतुलन होतं आणि साहजिकच वजन कमी व्हायचं नाव घेत नाही. ही सवय आजच मोडा!
5 / 5
तुम्ही जर स्ट्रेस मध्ये असाल. कुठली चिंता तुम्हाला सतावत असेल तर तुम्हाला खूप लागते. तणावाची उच्च पातळी कोर्टिसोलच्या स्रावास चालना देते, ज्यामुळे आपल्याला भूक कंट्रोल होत नाही. रात्री झोपण्या आधी मेडिटेशन केलं किंवा तणाव कमी करण्याचे उपाय शोधले तर हा त्रास होणार नाही.