हे पदार्थ खा आणि गोड खायची लालसा कंट्रोल करा!
आपल्याला मध्येच काहीही खायची इच्छा होते. यात गोड खाण्याची लालसाच अधिक असते. ही लालसा कशी थांबवायची? आयुर्वेदात काही पदार्थ सांगितले गेलेत जे आपल्याला आपली लालसा कंट्रोल करण्यासाठी मदत करू शकतात. कोणते पदार्थ आहेत हे? जाणून घेऊया...
1 / 5
मेथीदाणे: मेथीच्या दाण्याला आयुर्वेदात फार महत्त्व आहे. हे दाणे रक्तातील साखरेची पातळी स्थिर करतात. मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी खा. सारखं गोड खायची इच्छा होत असेल तर मेथीच्या दाण्यांचे सेवन करा.
2 / 5
कारले: आयुर्वेदात असं सांगितलं गेलंय की जर तुम्हाला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर कडू पदार्थ तुम्हाला ही लालसा कमी करण्यात मदत करू शकतात. यात सगळ्यात वर येते कारले. कारले हा एक चांगला उपाय आहे. कारलं खाल्ल्याने गोड खायची इच्छा होत नाही. याने कफदोष सुद्धा दूर होतो. कारल्याचा ज्यूस तुम्ही रोज पिऊ शकता.
3 / 5
त्रिफळा: आवळा, बिभीतकी आणि हरितकी मिळून त्रिफळा तयार होते. त्रिफळा चूर्ण पचन सुलभ करते. त्रिफळा मुळे वजन मेंटेन राहते आणि शरीर सुद्धा डिटॉक्सिफाई करते. झोपण्याआधी जर त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतलं की त्याचा फायदा होतो.
4 / 5
अश्वगंधा: ताणतणाव असेल तर आपल्याला गोड खायची इच्छा होते. यासाठी आपण ताणतणाव कमी करायचा प्रयत्न करायला हवा. आयुर्वेदात अश्वगंधा हे ताणतणाव दूर करण्यासाठी बेस्ट आहे असं सांगितलं गेलंय. अश्वगंधा तुम्ही दुधात टाकून पिऊ शकता शिवाय त्याचा चहा सुद्धा बनवला जाऊ शकतो.
5 / 5
बडीशेप: आपण नेहमी ऐकतो जेवणानंतर बडीशेप खावी. पण याची कारणे काय असतात? बडीशेप पचनास मदत करते. जेवणानंतर बडीशेप खाल्ली की त्यानंतर काहीच खायची लालसा होत नाही. जर तुम्हाला जेवल्या नंतर सुद्धा भूक लागत असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता.