PHOTO | ‘बाण हायकर्स’चा स्तुत्य उपक्रम, भिवपुरीच्या जंगलात ट्रेकर्स ग्रुपने राबवली वृक्षारोपण मोहीम!

| Updated on: Jun 23, 2021 | 4:27 PM

गेल्या चार वर्षांपासून भिवपुरी येथील जंगलामध्ये 'बाण हायकर्स' (Baan Hikers) तर्फे वृक्षारोपण केले जाते. यावर्षी या मोहिमेअंतर्गंत 200 झाडांचे रोपण ‘बाण’च्या सदस्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने केले.

1 / 6

2 / 6
या मोहिमेत बाण हायकर्सचे 30 सदस्य सहभागी झाले होते. भिवपुरी येथील माळरानावर पाच फुटांची रोपे  आणण्याचे मोठे आव्हान होते. हे आव्हान गावातील तरुण मंडळींच्या सहभागातून पेलणे शक्य झाले.

3 / 6
भिवपुरीच्या या माळरानावर कडुलिंब, पिंपळ, गुलमोहर, सीसम, कांचन, कदंब, अशोक, अर्जुन, जांभूळ, आंबा इत्यादी झाडे लावण्यात आली. भविष्यात या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील ‘बाण हायकर्स’ने घेतली आहे.

4 / 6
यामध्ये झाडांभोवती कुंपण घालणे, त्यांना वेळोवेळी खत देणे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात या लावलेल्या झाडांना पाणी देण्याची जबाबदारी देखील 'बाण'ने घेतली आहे.

5 / 6
याशिवाय अनेक कामे भविष्यात करायची आहेत. यासाठी लोकसहभागाबरोबर आर्थिक पाठबळ देखील गरजेचे आहे.

6 / 6
त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी, पर्यावरणप्रेमींनी त्यांना जमेल तशी मदत करावी, असे आवाहन 'बाण'तर्फे करण्यात आले आहे.