बदलापूरमध्ये पोलिसांनी अखेर आंदोलकांवर लाठीचार्ज करत त्यांना पांगवले आहे.
पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत रेल्वे रुळावरुन बाजुले केले आहे.
पोलिसांनी लाठीचार्ज करताच एकच गोंधळ उडाला. ज्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.
आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानंतर काही आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.
पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे रुळ मोकळा करण्याचं आवाहन केले होते. पण तरी देखील आंदोलकांनी आंदोलन सुरुच ठेवले होते.
पोलिसांनी बदलापूर स्टेशनचा परिसर मोकळा केला आहे. आंदोलकांना येथून पांगवले जात आहे.