भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा (Jwala Gutta) लवकरच संसाराचा नवा डाव मांडणार आहे. बॉलिवूड अभिनेता विष्णू विशाल (Vishnu Vishal) याच्यासोबत ती लग्न करणार आहे.
ज्वाला गुट्टाॉने तिच्या इंस्टाग्रामवरून 22 एप्रिल 2021 ला अभिनेता विष्णू विशालसोबत लग्न करत असल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. या लग्नसोहळ्याला काही मोजक्याच लोकांची उपस्थिती असणार आहे असे ज्वाला गुट्टाने सोशल मीडियावरून सांगितले आहे.
विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर या दोघांचे फोटोही चर्चेचा विषय ठरत होता. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात विष्णू विशाल आणि ज्वालाने साखरपुडा केला होता.
विष्णू विशाल हा तामिळ अभिनेता आणि निर्माता आहे. त्याचा अरण्य हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. येत्या 26 तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटात विष्णू विशाल हा एका माहुताची भूमिका साकारत आहे.
चित्रपटसृष्टी येण्यापूर्वी विष्णू विशाल याने क्रिकेटमध्येही नशीब आजमावून पाहिले होते. मात्र, पायाच्या दुखापतीमुळे त्याने हे क्षेत्र सोडले होते. त्यानंतर 2009 मध्ये विष्णू विशालने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
यापूर्वी 2005 साली ज्वाला गुट्टा हिने बॅडमिंटनपटू चेतन आनंदशी लग्न केले होते. मात्र, दोघांमधील वादामुळे हे नाते फारकाळ टिकू शकले नव्हते. ज्वाला आणि चेतन आनंद 2011 मध्ये एकमेकांपासून विभक्त झाले होते.