Marathi News Photo gallery Bail was granted, vomiting stopped, BP also returned to normal, did you read the reaction on the photo of Nitesh Rane Fadnavis meeting?
जामीन मिळाला, उलट्या थांबल्या, बीपीही नॉर्मल झाला, नितेश राणे-फडणवीस भेटीच्या फोटोवरच्या प्रतिक्रिया वाचल्या का?
प्रकृतीचं कारण देत जामीन मिळविलेल्या नितेश राणे काल भाजपच्या गोव्यातील कार्यक्रमात दिसल्याने त्याच्यावरती नेटकर्यांनी जोरदार टीका टिपणी केल्याचे पाहावयास मिळत आहे.
1 / 9
नितेश राणे यांच्यावरती शिवसेनेचे नेते संतोष परब यांच्यावरती हल्ला केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ज्यावेळी संतोष परब यांच्यावरती हल्ला झाला होता, त्यावेळी त्यांनी तिथल्या हल्लेखोराने नितेश राणेंना कळवायला पाहिजे असा उल्लेख केला होता.
2 / 9
भाजपचे आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ल्याप्रकरणी दोन दिवस जिल्हा सत्र न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देखील देण्यात आली. परंतु त्यांची प्रकृती खालावल्याचे कारण पुढे त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
3 / 9
जामीन मंजुर झाल्य़ानंतर नितेश राणे यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असल्याचे पाहावयास मिळत आहे, असे एका नेटक-याने म्हणले आहे. तसेच त्यांनी काल एका कार्यक्रमाला भेट दिली तिथं त्यांना देवेद्र फडणवीस आणि इतर कार्यकर्त्यांसोबत फोटो काढले आहेत.
4 / 9
गोवा भाजपच्या प्रचार मैदानात दबंग आमदार नितेश राणे साहेब, मोदींच्या सभेत खुद्द फडणवीसांकडून नितेश राणेंचा सन्मान, बसविले पहील्या रांगेत; गोव्यातही नितेश राणेंची क्रेझ, अनेकांकडून फोटोसेशन अशी कमेंट करून नेटकर्याने प्रश्न उपस्थित केला आहे.
5 / 9
काल रात्री नितेश राणेंनी आपल्या फेसबुकच्या अकाऊंटवरती काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ते अनेक कार्यकर्त्यांना भेटले असल्याचे पाहायला मिळते. तसेच आजाराचं कारण सांगून जामिन मिळवल्याने त्यांच्यावर अनेकांनी टीका केल्याचे सुध्दा पाहायला मिळते.
6 / 9
"अटक वॉरंट निघालं की थातीत दुखायला लागत ह्या राजकीय नेत्यांच्या आणि जामिन मिळाली की लगेच बोंबलत फिरायला कसे बरे होतात ह्याची त्या ईडी ला चौकशी करायला लावा" असं एका नेटक-यांने त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरती म्हणटल आहे.
7 / 9
डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे तुम्ही तर दोन दिवस आराम करणार होते ? माननीय मोदी साहेबांना दोन दिवस माझ्याकडून प्रचार होणार नाही असे सांगून टाकायचे. तुम्ही तब्येतेची काळजी न घेता गोव्यात असं म्हणून एका नेटक-याने त्यांना प्रश्न विचारला आहे.
8 / 9
आता आराम कर नाही तर परत गोव्याच्या ठाण्यात जाशिल अशी एकाने मजेशीर कमेंट केली आहे.
9 / 9
छातीच्या कळा एकदम अचानक बंद झाल्या? जनतेला सुद्धा असे डॉक्टर्स उपलब्ध करून द्या साहेब अशीही एकाने फोटोखाली प्रतिक्रिया दिली आहे.