चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी बीसीसीआयने आपली तिजोरी उघडली आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाने विजेत्या टीमसाठी 58 कोटी रुपयाच्या इनामाची घोषणा केली आहे.
रोहित-विराट सारख्या दिग्गजांना किती पैसा मिळणार? आणि हेड कोच गौतम गंभीर यांना किती रक्कम मिळणार? जाणून घ्या.
इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे विजयात योगदान देणाऱ्या कुठल्या व्यक्तीला सर्वात कमी रक्कम मिळणार?. एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की, फक्त बीसीसीआयच इनामच नाही, तर आयसीसीकडून मिळणारे 20 कोटी रुपयेही खेळाडूंना देण्यात येतील.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्नुसार 58 कोटी रुपयाच्या या रक्कमेत 15 सदस्यीय टीममधील प्रत्येक खेळाडूला 3-3 कोटी रुपये मिळतील.
त्याशिवाय बीसीसीआयने निर्णय घेतलाय की, आयसीसी ट्रॉफी जिंकल्यानंतर मिळणारी 20 कोटी रुपयाची रक्कम फक्त टीम इंडियाच्या खेळाडूंमध्येच वाटली जाईल. म्हणजे त्या रक्कमेत हेड कोच आणि सपोर्ट स्टाफला काही मिळणार नाही.
भारताचे हेड कोच गौतम गंभीर यांना खेळाडूंच्या बरोबरीने 3 कोटी रुपये मिळतील. सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला 50 लाख रुपये मिळतील.
भारताचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांना 30 लाख रुपये मिळणार आहेत. निवड समितीच्या अन्य चार सदस्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये मिळतील.
BCCI चे स्टाफ सदस्य जे टीम इंडियासोबत दुबईत होते, त्यांना प्रत्येकी 25-25 लाख मिळतील.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकणाऱ्या टीम इंडियासाठी 58 कोटी रुपयाच्या इनामी रक्कमेची घोषणा करताना आनंद होत आहे असं बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजे BCCI ने म्हटलं आहे.
हा आर्थिक पुरस्कार खेळाडू, कोचिंग, सपोर्ट स्टाफ आणि पुरुष टीमच्या निवड समिती सदस्यांना त्यांच्या योगदानासाठी देण्यात येणार आहे.