Ashadi Ekadashi 2021| नियम पाळले, पंरपराही जपली, मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पहिला रिंगण सोहळा संपन्न
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. मात्र तरीही या सोहळ्याचा रिती-परंपरा यामध्ये कुठला खंड पडू नये म्हणून यासाठी देहूमधील देऊळवाडा परिसरात हे रिंगण सोहळा पार पडले.
1 / 7
येत्या 20 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी (Ashadi Ekadashi 2021) पंढरपूर नगरी सज्ज झाली आहे.
2 / 7
नुकतेच देहू मधील संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात आज पहिले गोल रिंगण पार पडले. टाळ मृदुंगाच्या गजरात हा रिंगण सोहळा पार पडला.
3 / 7
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. मात्र तरीही या सोहळ्याच्या रिती-परंपरा यामध्ये कुठला खंड पडू नये म्हणून यासाठी देहूमधील देऊळवाडा परिसरात हे रिंगण सोहळा पार पडले.
4 / 7
दरवर्षी परंपरेनुसार हे रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवडी गावमध्ये पार पडते. त्याच पद्धतीने देहूमध्ये हे गोल रिंगण पार पडले.
5 / 7
त्यामध्ये कुठलाही खंड पडू नये यासाठी देहूमधील संत तुकाराम महाराज संस्थान कडून हे पहिले गोल रिंगण प्रतिकात्मक स्वरूपात आयोजित करण्यात आले होते. अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला,
6 / 7
यावेळी वारकऱ्यांनी आणि अश्व यांज संत तुकाराम महाराजांच्या पालखीला रिंगण केले होते.
7 / 7
कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्यावर्षी आषाढी वारी रद्द झाली होती. यंदाही या वारीवर कोरोनाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारीसाठी वारकऱ्यांना अनेक निर्बंध घातले आहेत.