तुळशीच्या पानांचे फायदे तुम्हाला माहित आहेत, आज वाचा तुळशीच्या बियांचे फायदे!

| Updated on: Sep 28, 2023 | 4:46 PM

तुळस ही अशी वनस्पती आहे जी जवळजवळ सगळ्याच भारतीयांच्या घरात दिसेल. तुळशीची पाने आपल्याला सर्दी, खोकला आणि अनेक विषाणूजन्य आजारांपासून वाचवतात. याशिवाय तुळशीच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, फायबर असते. जर तुम्ही या बियांचे पाणी प्यायले तर आरोग्यासाठी खूप फायदे होऊ शकतात.

1 / 5
तुळशीचे अनेक फायदे तुम्ही वाचले असतील. तुळस ही आयुर्वेदिक वनस्पती आहे, जिचे अनेक फायदे आहेत. पण तुळशीच्या बियांच्या पाण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत तुम्हाला माहितेय का? चला बघुयात, तुळशीचे पाणी पिण्याचे फायदे

2 / 5
तुळशीच्या बियांमध्ये म्युसिलेज नावाचा जेलसारखा पदार्थ असतो जो पाण्यात भिजवल्यावर सूज येतो. हा जेलसारखा पदार्थ आतड्यांसंबंधी हालचालींना प्रोत्साहित करण्यास आणि बद्धकोष्ठता रोखण्यास मदत करतो.

3 / 5
उष्ण आणि दमट हवामानात शरीरात पाण्याची कमतरता असते, या काळात तुळशीच्या बियांचे पाणी प्यायल्यास शरीरातील पाण्याचे पातळी टिकून राहील आणि डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. अशावेळी शरीराची सर्व कामे व्यवस्थित होतील.

4 / 5
आजकाल वजन कमी करण्यासाठी खूपजण प्रयत्न करतायत. वाढत्या वजनामुळे खूप जण त्रस्त आहेत. यावर उत्तम उपाय आहे तुळशीच्या बिया. या बिया पाण्यात टाकून भिजवल्या आणि पाणी प्यायलं की वजन कमी होतं. या पाण्याने भूक कमी लागते.

5 / 5
मधुमेह असणाऱ्यांसाठी या बिया जादू करतात. या बिया रक्तातील साखर नियंत्रित करतात. मधुमेह रुग्णांनी या पाण्याचं सेवन न चुकता करावे याने खूप फायदा होतो.