प्रोटीनचा खजिना आहे हा ड्रायफ्रूट, पाण्यात भिजवून 7 दिवस सेवन केल्यावर मसल्स होतील मजबूत
Benefits of Eating Almonds: प्रत्येकाला आपले शरीर सदृढ हवे असते. शरीर मजबूत करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या वस्तूंचे सेवन करतात. स्नायूंना मजबूत करण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थ खातात. बरेच लोक प्रोटीन सप्लिमेंट्स सुरू करतात.
1 / 5
काही नैसर्गिक गोष्टींमध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते आणि या गोष्टी खाल्ल्याने शरीरात एखाद्या पैलवानसारखी ताकद येते. आकाराने लहान दिसणाऱ्या बदामामध्ये प्रोटीनचा मुबलक साठा आहे. हे सर्वात शक्तिशाली ड्राय फ्रूट तुमचे स्नायू खूप मजबूत बनवू शकते.
2 / 5
डायटिशियन कामिनी सिन्हा बदामाचे महत्व सांगताना म्हणतात, बदाम खूप फायदेशीर ड्रायफ्रूट आहे. हे योग्य पद्धतीने सेवन केले तर मसल्स अधिक मजबूत होतात. रात्रभर पाण्यात भिजवून पाच ते दहा बदाम दूधात घेऊन खाल्यास शरीराला मुबलक प्रोटीन मिळते.
3 / 5
रिसर्चमधून स्पष्ट झाले आहे की, 35 ग्रॅम बदामात 7 ग्रॅम प्रोटीन असते. एका व्यक्तीला लागणाऱ्या प्रोटीनपैकी 10% पेक्षा जास्त प्रोटीन बदामातून मिळतात. प्रोटीनसोबत बदामात एंटीऑक्सीडेंट आहे. बदाम हा व्हिटॅमिन ईचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जाऊ शकतो. व्हिटॅमिन ई हृदयरोग आणि अल्झायमरसारख्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
4 / 5
बदामात प्रोटीनसोबत फायबर, व्हिटामिन E, व्हिटामिन B12, मँग्नीझ, मॅग्नीशियम, कॉपर, फॉस्फोरस आणि हेल्दी फॅट्स असतात. त्यामुळे हे शरीरासाठी हे सुपर फूड मानले जाते. बदामात असणारे एंटीऑक्सीडेंट तुमच्या शरीराच्या पेशींचे ऑक्सिडेटिव्हमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करते. तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करते.
5 / 5
बदामामुळे शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉल कमी होतो. तसेच ह्रदयाची क्षमती वाढते. रक्तातील शूगर नियंत्रित करण्यासाठी बदाम मदत करते. रक्तदाब (ब्लड प्रेशन) नियंत्रणात राहते. यामध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असल्यामुळे बदाम खाल्यानंतर लोकांना पोट भरलेले वाटते. वेट लॉस करण्यासाठी मदत होते.