आरोग्याला असंख्य फायदे देणारे पेरू, वाचा 5 महत्त्वाचे फायदे!
फळे खाताना आपण आपल्याला आवडणार तेच फळ खातो. खरं तर प्रत्येक फळाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं म्हणून सगळी फळे खात जा असा सल्ला दिला जातो. पेरू का खावा? पेरू खाण्याचे काय फायदे? हे आम्ही तुम्हाला यात सांगणार आहोत. वाचा पेरू खाण्याचे ५ फायदे...
1 / 5
पेरू हा व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन सी स्किन साठी चांगलं मानलं जातं. हे व्हिटॅमिन आपल्याला बऱ्याच आजारांपासून दूर ठेवतं. पेरूमध्ये फायबरचं प्रमाण पण चांगलं असतं. फायबर खाल्ल्याने पचन चांगलं होतं. फायबर जास्त आणि कॅलरी कमी त्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहतं.
2 / 5
मधुमेहात अनेक पथ्य सांगितली जातात. मधुमेहात कोणती फळे खावीत कोणती नाहीत हेही सांगितलं जातं. पेरू मधुमेहासाठी चांगलं फळ आहे. पेरू खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तुम्ही जर मधुमेहाचे रुग्ण असाल तर हे फळ नक्की खा.
3 / 5
पेरूमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी इतकंच नव्हे तर पोटॅशियम सुद्धा चांगल्या प्रमाणात असतं, पोटॅशियमने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. पेरू डोळ्यांसाठी चांगला असतो. यात व्हिटॅमिन ए देखील असतं.
4 / 5
पेरू खाल्ल्याने कर्करोग दूर राहतो, पेरू मध्ये अनेक पोषक घटक तर असतातच पण अँटिऑक्सिडंट्स देखील आहेत जे अनेक रोगाशी दोन हात करतात.
5 / 5
पेरूमध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीराच्या बऱ्याच भागात ऑक्सिजन पोहचवतात. पेरू रक्त शुद्ध करण्यास मदत करते. पेरूमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि साखर सुद्धा नियंत्रित राहते.