खरबूजच नाही तर त्याच्या बिया देखील आहेत आरोग्याचा खजिना! जाणून घ्या 5 फायदे

| Updated on: Oct 09, 2023 | 8:34 AM

खरबूज आरोग्यासाठी जितकं चांगलं आहे तितक्याच त्याच्या बिया आरोग्यासाठी चांगल्या आहेत. या बिया सकाळी नाश्त्यामध्ये खाल्ल्या तरी त्याचा खूप फायदा होतो. भोपळा, खरबूज, टरबूज, चिया सीड्स याचे सेवन नाश्त्यात करा. सकाळी या बिया खाल्ल्या की दिवसभर ऊर्जा टिकून राहते. या बिया आरोग्यासाठी खूप चांगल्या आहेत.

1 / 5
स्प्राउट्स हा उत्तम उपाय आहे. झपाट्याने वजन कमी करायचं असेल तर आजपासूनच स्प्राउट्स खाण्यास सुरुवात करा. स्प्राउट्समध्ये कॅलरी कमी असतात. हे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि चरबी वाढत नाही. यामुळे आपली पचनशक्तीही मजबूत होते.

2 / 5
खरबूजाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. या बियांमुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. सर्दी, खोकला, ताप आणि इतर आजार यामुळे दूर पळतात.

3 / 5
आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण निरोगी आहार घेतो, आपण जवळपास सगळ्याच गोष्टींची काळजी घेतो. पण आपण आतड्यांचं आरोग्य सांभाळायचं विसरतो. आतड्यांची काळजी विशेष घ्यायला हवी. खरबूजाच्या बिया बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते. याने आतड्यांसंबंधी हालचाली सुरळीत होतात. पचन सुलभ करण्यासाठी खरबूजाच्या बिया उत्तम आहेत.

4 / 5
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स यासोबतच खरबूजाच्या बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड चांगल्या प्रमाणात असतं. ओमेगा -3 फॅटी अॅसिड मुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. या बियांमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. खरबूजाच्या बिया तुम्ही सकाळी उठून नाश्त्यात खाऊ शकता.

5 / 5
मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस या घटकांची गरज आपल्या हाडांना असते हे काय वेगळं सांगायची गरज नाही. हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी खरबूजाच्या बियांचा आहारात समावेश करा. यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होण्यास मदत होते.