कार प्रेमी साठी खुशखबर !! प्रत्येक वर्षी इलेक्ट्रिक कार लॉन्च करेल Bentley, लवकरच होईल सुरुवात…
Bentley लवकरच इलेक्ट्रिक क्षेत्रात पदार्पण करणार आहे आणि प्रत्येक वर्षी इलेक्ट्रिक कार मार्केट मध्ये आणणार आहे आणि नवीन पाच कारचे लॉन्चिंग करणार आहे. याची सुरुवात वर्ष 2025 पासून होईल.
1 / 5
ब्रिटिश लक्झरी कार निर्माण करणारी कंपनी बेंटले मोटर्सने घोषणा केली आहे की, ते लवकरच इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहेत.ज्यामुळे ते नवीन क्षेत्रात प्रवेश करणार आहेत त्याचबरोबर नवीन क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर त्यांचा नवीन प्रवास सुरू होणार आहेत आणि हा नवीन प्रवास यशाच्या वाटेवर प्रगतशील राहणार आहे आणि प्रत्येक वर्षी इलेक्ट्रिक कार नव्याने बाजारात आणणार आहेत.या प्रवासाची सुरुवात वर्ष 2025 पासून होईल. जगात सर्वात पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च केली जाईल. आपल्या सांगू इच्छितो की, बेंटलेची स्पर्धा रॉल्स रॉयस च्या कार बरोबर होणार आहे.
2 / 5
बेंटले ने याबद्दल आधीच घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या आपल्या प्लॅनचे नाव फाइव इन फाइव असे ठेवले आहे. याद्वारेच पाच इलेक्ट्रिक कारचे लॉंचिंग केले जाईल.
3 / 5
आपणास सांगू इच्छितो की, जगभरात उपलब्ध असणारे कार निर्माण करणारी कंपनी इलेक्ट्रिक कार बनवण्याकडे वाटचाल करताना पाहायला मिळत आहे जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण होऊ शकेल. कंपनीने आधीच घोषणा केली होती की ही कार क्लीन आणि ग्रीन एनर्जी या अनुषंगाने भविष्यात आपले महत्त्वाचे पाऊल उचलेल.
4 / 5
इलेक्ट्रिक कारला यूके क्रेवे मध्ये तयार केले जाईल. ही कंपनी नवीन पार्ट तर तयार करणारच, पण इतर ठिकाणांहून बसवलेले पार्ट ही एकत्र करेल.
5 / 5
एवढंच नाही तर आपल्या कारखान्यासाठी बेंटले कंपनीने एक सोलर एनर्जी पॅनल लावण्यास सुरुवात केली आहे. कंपनी येणाऱ्या वर्षांमध्ये 30-40 हजार पॅनलचा वापर करेल सोबतच या कंपनीशी अशी इच्छा आहे की येणाऱ्या काळात बायोफ्यूल वापर करावा जेणेकरून भविष्यात यामुळे लाभ मिळू शकेल.