जगात भारी हीच Photography! कधीही न पाहिलेले बेस्ट 5 फोटोग्राफ
हा फोटो बघा, अशा फोटोसाठी तुम्हाला कुठल्या चांगल्या कॅमेऱ्याची नाही तर थोडं डोकं लावायची गरज आहे. या व्यक्तीच्या समोर लॅपटॉप आहे, त्याच्यामागे मांजर झोपलंय पण दिसताना काय दिसतंय? जणू काही त्या मांजराने बिकिनी घातलीय. हा फोटो बघून तुम्ही खूप हसाल.
1 / 5
अंडर वॉटर फोटो काढणं पूर्वी लोकांचं स्वप्न असायचं. तेव्हा लोकांना वाटायचं असं काही होऊ शकतं का? माणूस फक्त कल्पना करू शकत होता आणि ते काही वर्षांनी शक्य देखील झालं. आता पाण्याखाली काढले गेलेले अनेक फोटो आपलं लक्ष वेधून घेतात. हा फोटोच बघा यात एक पोहणारा माणूस आणि मासा कॅमेऱ्यात कैद झालेत, वेळ इतकी अचूक आहे की यात माणसाचं धड आणि माश्याचं डोकं दिसतंय.
2 / 5
आता हा फोटो बघा. याच्या इतका परफेक्ट टायमिंग जगात कुठेच नाही असंच म्हणाल तुम्ही! अहो कसं म्हणजे फोटोग्राफरचं डोकं कसं चाललं असेल? अलीकडे घोडा उभा आणि पलीकडे दुसरा प्राणी. पण हा फोटो बघून माणूस गोंधळून जातोय, जसं काय हे एखादं कोडं असावं, हो ना? फोटो बघताना वाटतं या घोड्याच्या तोंडातून तो प्राणी येतोय. वास्तविक घोडा अलीकडे आणि तो प्राणी पलीकडे आहे. टायमिंग आणि कॅमेरा अँगलचा खेळ आहे हा सगळा!
3 / 5
जर तुम्ही या फोटोमध्ये लाल टीशर्ट घातलेल्या माणसाकडे बघत असाल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी फोकस करताय. तुमचं लक्ष लाल टीशर्ट घातलेल्या माणसाच्या खाली जो छोटा मुलगा आहे त्यावर असायला हवं. त्या मुलाकडे बघा, त्याला त्याच्या शेजारी बसलेल्या वडिलांनी वाचवलंय. तो मुलगा थोडक्यात वाचलाय. काय परफेक्ट टाईम आहेना फोटोग्राफरचा? फोटोत बघून तिथं काय घडलं असेल याची कल्पना येते.
4 / 5
पेट फोटोग्राफी! लोकांना आपल्या मुलांप्रमाणेच आपली मांजर, आपलं कुत्रं खूप प्रिय असतं. त्यांची ते खास फोटोग्राफी करवून घेतात. फोटोग्राफर सुद्धा इतकी चांगली संधी का सोडतील? आता हे कुत्र बघा, अहा! काय ते हावभाव, काय ते डोळे, काय त्या फोटोचं टायमिंग! कमाल.
5 / 5
एखाद्या कुटुंबाचे तुम्ही आजवर फक्त हसताना, एकमेकांच्या शेजारी बसून काढलेले फोटो पाहिले असतील. कुटुंबाचे कधी विचित्र फोटो पाहण्यात येतच नाही. पण हा फोटो बघा, छोटीशी मुलगी चालता चालता पडते. तुम्ही म्हणाल मग? पण ती पडताना हा फोटो काढला गेलाय, आता हे टॅलेंट नाही का? इतक्या परफेक्ट टायमिंग साठी फोटोग्राफर सुद्धा टॅलेंटेड हवा नाही का?