PHOTO : मोनालिसाच्या घायाळ करणाऱ्या अदा, नव्या फोटोशूटमुळे अभिनेत्री चर्चेत
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा तिच्या बोल्ड अंदाजसाठी प्रसिद्ध आहे (Bhojpuri Actress Monalisa share her new photos).
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा तिच्या बोल्ड अंदाजसाठी प्रसिद्ध आहे.
Follow us on
अभिनेत्री मोनालिसाने नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे, ज्याचे फोटो तिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ब्लॅक अॅण्ड ग्रे आऊटफिटमध्ये मोनालिसाचा नवा लूक खूप छान वाटतोय. विशेष म्हणजे तिची सिल्व्हर ज्वेलेरी त्यावर परफेक्ट मॅच झालीय.
मोनालिसाचा हा एक ट्रॅडिशनल लूक आहे. मात्र या ट्र्रॅडिशनल लूकलाही तिने हॉट बनवलंय.
मोनालिसाने फोटो शेअर करत आपला हा लूक कलर्स टीव्हीच्या होळीच्या कार्यक्रमासाठी आहे, असं तिने सांगितलं.
मोनालिसाच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटिंनीदेखील कमेंट केली आहे.
मोनालिसाने फक्त भोजपूरीच नाही तर हिंदी, बंगाली, तेलगू, तामिळ, कन्नड चित्रपटातही काम केलंय. याशिवाय टीव्हीवरही ती काम करतेय.
मोनालिसाने ‘ब्लॅकमेल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने अजय देवगन आणि सुनील शेट्टी सोबत काम केलं होतं. त्यानंतर बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर ती जास्त लोकप्रिय झाली. तिने बिग बॉसमध्ये विक्रांतसोबत लग्न केलं होतं.