lonavala bhushi dam : लोणावळा येथील भुशी डॅम ओव्हरफ्लो, पर्यटकांच्या आनंदाला उधाण
lonavala bhushi dam : पुणे, मुंबईसह लोणावळा - खंडाळा परिसरात पावसाने चांगलाच धोर धरला आहे. यामुळे लोणावळा येथील भुशी डॅम ओव्हरफ्लो झाले आहे. हे डॅम नेहमी पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे.
1 / 7
राज्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. पुणे, मुंबईत संपूर्ण आठवडाभर रिमझिम पाऊस झाला. या पावसामुळे पर्यटकही पर्यटनासाठी बाहेर पडले आहे.
2 / 7
लोणावळा - खंडाळा परिसरात पावसाने चांगलाच धोर धरला आहे. लोणावळ्यातील वर्षाविहार हे पर्यटकांसाठी आवडते ठिकाण आहे. पर्यटकांचे आवड असणारे भुशी डॅम ओव्हरफ्लो झाले आहे.
3 / 7
भुशी डॅप ओव्हरफ्लो झाल्यामुळे पर्यटकांची लोणावळा येथे गर्दी होऊ लागली आहे. युवत, युवतींच्या आनंदाला उधाण आले आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने इतर ठिकाणी धबधबे कोसाळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोणावळा-खंडाळा परिसराचे निसर्ग सौंदर्य खुलले आहे.
4 / 7
लोणावळा अन् खंडाळा परिसरातील निसर्ग सौंदर्य खुलले आहे. यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागले आहे. शनिवार अन् रविवारीची सुटी साधत पर्यटकांची गर्दी लोणावळा अन् खंडाळा येथे होत आहे.
5 / 7
मुंबई अन् पुणे शहरातील पर्यटक लोणावळा, खंडाळा येथे येत आहे. यामुळे ही दोन्ही शहरे पर्यटकांनी गजबजून गेली आहे.
6 / 7
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहरासह तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. इगतपुरी परिसरातही पर्यटनासाठी पर्यंटक येऊ लागले आहे. या ठिकाणी धबधबे ओसंडून वाहू लागले आहे.
7 / 7
पुणे, मुंबई परिसरात जे काही पावसाळी पर्यटनाची स्थळे आहेत, त्या ठिकाणी शनिवार, रविवारी गर्दी होऊ लागली आहे. यामुळे स्थानिक दुकानदारांचा व्यवसाय वाढला आहे.