amitabh bachchan : हे अमिताभ बच्चन नाहीत, पुणेकर शशिकांत पेडवाल

| Updated on: Aug 18, 2023 | 4:13 PM

Big B Doppelganger : महानायक अमिताभ बच्चन यांचे डुप्लीकेट म्हणून ओळखले जाणारे शशिकांत पेडवाल पुणे शहरातील आहेत. दोघांच्या चेहऱ्यात इतके साम्य आहे की अमिताभ बच्चन यांनाही त्याचा फोटो पाहून धक्का बसला होता.

1 / 5
पुणे शहरात राहणारे शशिकांत पेडवाल अमिताभ बच्चनप्रमाणे दिसतात. त्यांचे फोटो पाहून अमिताभ बच्चन यांनाही आश्चर्य वाटले होते. शशिकांत मिमिक्री आर्टिस्ट आहे. हिंदी चित्रपटातील अनेक स्टार्सची मिमिक्री त्यांनी केली आहे.

2 / 5
शशिकांत पेडवाल यांच्यावर अमिताभ बच्चन यांचा खूप प्रभाव आहे. ते पुणे येथील महाविद्यालयात प्रोफेसर आहेत. शासकीय महाविद्यालयात प्रोफेसर असल्यामुळे त्यांना तीन, चार वर्षांत बदली होत असते.

3 / 5
जळगावमध्ये शासकीय महाविद्यालाय प्रोफेसर असताना खान्देश फेस्टीव्हल कार्यक्रमात शशिकांत पेडवाल गेले होते. त्या कार्यक्रमात श्रेया घोषाल आली होती. त्यावेळी कार्यक्रमादरम्यान श्रेया घोषाल यांना ब्रेक हवा होता. त्या १५ मिनिटांत शशिकांत यांनी अमिताभ यांची मिमिक्री त्यांनी केली.

4 / 5
खान्देश फेस्टीव्हनंतर शशिकांत पेडवाल यांची ओळख बच्चन साहब म्हणून सुरु झाली. माध्यमांमध्ये त्यांची चर्चा सुरु झाली. अनेक ठिकाणांवरुन त्यांना आमंत्रण येऊ लागले. ते कार्यक्रमास जाऊ लागले.

5 / 5
2011 मध्ये शशिकांत पेडवाल यांची अमिताभ बच्चन यांच्याशी भेट झाली. त्यावेळी त्यांनी फोटोचा अल्बम दाखवले. अमिताभ यांना ते फोटो स्वत:चे वाटले. परंतु त्यावेळी शशिकांत यांनी खुलासा करत सांगितले की, सर क्षमा करें, यह फोटो आपके नहीं बल्कि मेरे हैं।