India-Maldives deal : चीनचा जळफळाट होणार, भारतासाठी मालदीवने घेतला खास मोठा निर्णय

| Updated on: Aug 14, 2024 | 11:43 AM

India-Maldives deal : मागच्या काही काळात भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले होते. पण आता हळूहळ हे संबंध पूर्ववत होत आहेत. मालदीव सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. चीनसाठी हा निर्णय म्हणजे झटका आहे.

1 / 10
मालदीवने त्यांच्या 28 बेटांची व्यवस्था भारताकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या 28 बेटांवर पाणी पुरवठा आणि सीवरशी संबंधित योजनांची कामं आणि देखभालीची जबाबदारी भारताची असेल.

2 / 10
मालदीवचे राष्ट्रपीत मोहम्मद मुइज्जू यांनी स्वत: ही घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. "मालदीवच्या 28 बेटांवर पाणी पुरवठा योजनांची जबाबदारी एस जयशंकर यांच्याकडे सोपवताना आनंद झाला. नेहमीच मालदीवची मदत केल्याबद्दल भारत सरकार आणि खासकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो" असं मुइज्जू यांनी त्यांच्याा सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

3 / 10
मालदीवमध्ये जवळपास 1190 बेटं आहेत. त्यात 200 बेटांवर लोक राहतात. 150 बेटांना पर्यटनासाठी विकसित करण्यात आलं आहे. आता 200 पैकी 28 बेटं भारताच्या ताब्यात येणार आहेत.

4 / 10
मालदीव आणि भारतामध्ये झालेला हा करार भारत विरोधकांना चांगलाच झोंबणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते.

5 / 10
बांग्लादेशमध्ये भारत समर्थक सरकार कोसळल्यानंतर कुटनितीच्या दृष्टीने भारतासाठी ही एक चांगली बातमी आहे. फक्त पाणी आणि सीवरच्या साफसफाईसाठी मुइज्जू यांनी 28 बेटांची व्यवस्था भारताकडे का सोपवली ? असा प्रश्न पडू शकतो. मालदीवमध्ये हॉटेल आणि रिसॉर्ट्सना कचरा फेकण्यासाठी खूप कठोर नियम आहेत.

6 / 10
हॉटेल आणि रिसॉर्ट्सना कचरा वेगवेगळा करावा लागतो. घन कचरा थिलाफुशी बेटावर पाठवला जातो. कचरा योग्य पद्धतीने लेबल आणि पॅक करण्याची जबाबदारी हॉटेल आणि रिसॉर्ट्सची असते.

7 / 10
मालदीवमधील थिलाफुशी बेट ‘गारबेज आयलँड’ म्हणून ओळखलं जातं. कचरा फेकण्यासाठी या बेटाचा वापर होतो. हे बेट मालेपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. 1990 च्या दशकात कचरा फेकण्यासाठी लँडफिल म्हणून हे बेट विकसित करण्यात आलं.

8 / 10
दुसऱ्या बेटांवरुन कचरा गोळा करुन थिलाफुशी बेटावर आणला जातो. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी भारत मालदीवला टेक्नोलॉजी आणि आर्थिक मदत देतो.

9 / 10
मालदीव छोटासा देश असला तरी हिंद महासागर क्षेत्रातील एक प्रमुख देश आहे. शेजाऱ्यांना प्रथम प्राधान्य हे भारताच धोरण आहे. मालदीव भारताचा मोठा व्यापारी भागीदार आहे. त्याशिवाय मालदीवमधील पर्यटनात भारताचा मोठा वाटा आहे.

10 / 10
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या मालदीव दौऱ्यावर चीनच खूप बारीक लक्ष होतं. चीनला मालदीव बरोबर खूप खास संबंधांची, सहकार्याची अपेक्षा नाहीय असं ग्लोबल टाइम्समधील लेखात म्हटलं आहे. यातून चीनचा जळफळाट स्पष्ट दिसून येतो. भारताचे मालदीव बरोबर संबंध बिघडवण्यात चीन अपयशी ठरला आहे.