‘डॅशिंग गर्ल’चा टॅग सोडून महजबी सिद्दीकी कायस्वरुपी हिजाब परिधान करणार, निर्णयाची चर्चा तर होणारच!
बिग बॉसच्या 11 व्या सिझनमधली स्पर्धक महजबी सिद्दीकी हीने एक निर्णय घेतलाय. त्यामुळे सगळेच जण आश्चर्य चकित झालेत. तिने एक पोस्ट शेअर करत आपण ग्लॅमरस जग सोडत हिजाब परिधान करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.
1 / 5
बिग बॉसच्या 11 व्या सिझनमधली स्पर्धक महजबी सिद्दीकी हीने एक निर्णय घेतलाय. त्यामुळे सगळेच जण आश्चर्य चकित झालेत. तिने एक पोस्ट शेअर करत आपण ग्लॅमरस जग सोडत हिजाब परिधान करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. याआधी बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसिमनेही बॉलिवूडला सोडचिठ्ठी देत आपल्या धर्माच्या परंपरांना अनुसरुन वागण्याचा निर्णय घेतलाय.
2 / 5
इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिने आपण हे चकचकीत जग सोडून अल्लाहने आखून दिलेल्या मार्गावर चालणार असल्याचं जाहीर केलं आहे. "इथून मागे आपण दिखाव्याच्या जगात जगत असून आता त्यातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे", असं महजबीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
3 / 5
महजबी सिद्दीकी बिगबॉसच्या 11 व्या सिझनमध्ये ती दिसली होती. तिच्यात आणि हिना खानमध्ये वादविवाद झाल्याचंही बघायला मिळालं होतं. त्यावेळी तिच्या डॅशिंगगिरीची चर्चा झाली होती. आता तिने घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसलाय.
4 / 5
मागच्या काही दिवसांपासून महजबी तिचे हिजाबमधले फोटो शेअर करताना दिसत आहे. तिच्या या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिच्या बदललेल्या रूपाला दाद दिली आहे. तर काहींनी "तू चांगली अभिनेत्री आहेस, तू या इडस्ट्रीमध्ये काम करत राहा", असं म्हटलंय.
5 / 5
महजबी सिद्दीकी बिग बॉसच्या 11 व्या सिझनमध्ये दिसली होती. बिग बॉसच्या घरात ती जास्त काळ टिकू शकली नाही. पण बाहेर आल्यानंतर ती अगदी ग्लॅमरस लूकमध्ये सगळ्यांसमोर आली होती. पण आता तिने या सगळ्याला रामराम करण्याचा निर्णय घेतलाय.