Marathi News Photo gallery Bigg Boss 17 Anurag Dobhal aks The UK07 Rider reveals he was diagnosed with brain tumour at the age of 6
वयाच्या 6 व्या वर्षी ब्रेन ट्युमर, 8 वर्षांपर्यंत उपचार; ‘बिग बॉस 17’च्या स्पर्धकाकडून मोठा खुलासा
बिग बॉसच्या सतराव्या सिझनमध्ये टीव्ही सेलिब्रिटींपासून ते युट्यूबर्सपर्यंत अनेकांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. या शोमधील एका स्पर्धकाने त्याच्या आरोग्याविषयी मोठा खुलासा केला आहे. वयाच्या सहाव्या वर्षी त्याला ब्रेन ट्युमरचं निदान झालं होतं आणि जवळपास आठ वर्षे त्याच्यावर उपचार सुरू होते.
1 / 6
मोटो व्लॉगर म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या अनुराग डोभालने 'बिग बॉस 17'च्या घरात नुकताच मोठा खुलासा केला. वयाच्या सहाव्या वर्षी ब्रेन ट्युमरचं निदान झाल्याचं त्याने सांगितलं. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अनुरागने त्याचा संघर्ष इतर स्पर्धकांना सांगितला.
2 / 6
"मी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलो. माझे वडील शिक्षक होते आणि मीसुद्धा माझं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. पदव्युत्तर शिक्षणानंतर मीसुद्धा शिक्षक बनण्यासाठी परीक्षा देण्याच्या तयारीत होतो. त्यावेळी मोटो व्लॉगिंगची संकल्पना मला माहीतसुद्धा नव्हती. पण मला नवनवीन जागी फिरायला जाणं आणि नवीन पदार्थ चाखण्याची खूप आवड होती", असं तो म्हणाला.
3 / 6
"मी ट्युशन क्लासेस घेऊ लागलो आणि त्यातून मला 300 रुपये मिळायचे. त्यानंतर मी शाळा-कॉलेजमध्ये शिकवू लागलो. वर्षाच्या अखेरपर्यंत मी कसेबसे एक लाख रुपये जमा केले. युट्यूबद्वारे मला काहीतरी करिअर करायचं आहे आणि त्यामुळे मला बाइक विकत घ्यायची आहे, असं वडिलांना सांगितलं. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि पैसे दिले", असं त्याने पुढे सांगितलं.
4 / 6
या प्रवासाविषयी अनुराग पुढे म्हणाला, "खूप मेहनत केल्यानंतर आज मला या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत. चांगले दिवस, वाईट दिवस, अत्यंत वाईट दिवस आणि आत्महत्येचा विचार आणणारे दिवसही मी पाहिले आहेत."
5 / 6
अनुरागने त्याच्या आरोग्याविषयी मोठा खुलासा केला. "मी लहानाचा मोठा होत असताना माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काही विशेष नव्हती. वयाच्या सहाव्या वर्षी मला ब्रेन ट्युमरचं निदान जालं होतं आणि चौदाव्या वर्षांपर्यंत माझ्यावर उपचार सुरू होते. त्यानंतरही तीन वर्षे मला आरोग्याच्या विविध समस्या जाणवत होत्या. कधी चक्कर तर कधी मिरगी अशा आरोग्याच्या समस्यांचा मी सामना केला", असं तो म्हणाला.
6 / 6
"त्यावेळी माझ्या वडिलांचा पगार फक्त 1200 रुपये होता. मला अस्थमाचाही त्रास होता. त्यासाठी लागणारा इनहेलर 300 रुपयांना मिळायचा. एवढ्युशा पगारातूनही माझे वडील माझ्या औषधांसाठी इतके पैसे खर्च करायचे. त्यांनी हे सर्व कसं केलं असेल याची कल्पनाही मला करवत नाही", अशा शब्दांत अनुरागने भावना व्यक्त केल्या.