‘बिग बॉस मराठी 5’तील सदस्य ढसाढसा रडले; का फुटला अश्रूंचा बांध?

| Updated on: Aug 16, 2024 | 2:57 PM

'बिग बॉस मराठी 5' हा शो दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर आणि 'जिओ सिनेमा' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येईल. या शोचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून त्यात घरातील स्पर्धकांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळतंय.

1 / 6
'बिग बॉस मराठी'च्या घरात आज अश्रूंचा महापूर येणार आहे. भावनांच्या खेळात भावशून्य झालेले सर्व सदस्य घरच्यांसोबत फोनवर बोलताना भावनिक झालेलं पाहायला मिळणार आहे.

2 / 6
'बिग बॉस मराठी'च्या घरात नेहमी हंगामा करणारे सदस्य भावूक झाल्याचं दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात कधी कोण कोणाचा मित्र होईल आणि कोण कधी कोणाचा शत्रू होईल हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे सदस्यांना आपल्या कुटुंबीयांची आठवण येणं स्वाभाविक आहे.

3 / 6
'बिग बॉस मराठी'चा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळत आहे. घरच्यांना फोन लावताच सदस्य ढसाढसा रडताना दिसून येत आहेत.

4 / 6
प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत, "सदस्यांनी साधला जिवलगांसोबत आपुलकीचा संवाद." 'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग पाहताना 'बिग बॉस'प्रेमींनादेखील अश्रू अनावर होणार आहेत.

5 / 6
नेहमी एकमेकांसोबत भिडणारे सदस्य आजच्या भागात आपल्या माणसांकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसणार आहेत.

6 / 6
'बिग बॉस मराठी 5' घरात येऊन स्पर्धकांना वीस दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या वीस दिवसांपासून कुटुंबीयांपासून दूर राहिल्याने स्पर्धक फोन बोलताना भावूक झाले आहेत.