Akanksha Puri | नाही तो माझा पती नाही बॉयफ्रेंड, आकांक्षा पुरी संतापली, अभिनेत्रीने केले धक्कादायक आरोप
आकांक्षा पुरी ही बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाली होती. आकांक्षा पुरी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. मात्र, नुकताच आकांक्षा पुरी ही बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडलीये. बिग बाॅस ओटीटीमध्ये असताना मोठ्या वादात आकांक्षा पुरी ही अडकली होती.
-
-
बिग बाॅस ओटीटी 2 रंगात आल्याचे बघायला मिळत आहे. आकांक्षा पुरी ही नुकताच बिग बाॅस ओटीटीमधून बाहेर पडलीये. आकांक्षा पुरी ही मोठ्या वादात अडकली होती.
-
-
बिग बाॅस ओटीटीच्या घरात असताना चक्क कॅमेऱ्यासमोर जद हदीद याच्यासोबत लिपलाॅक करताना आकांक्षा पुरी ही दिसली होती, त्यानंतर अनेकांनी तिच्यावर टिका करण्यास सुरूवात केली.
-
-
नुकताच आकांक्षा पुरी हिने मोठे भाष्य केले आहे. आकांक्षा पुरी म्हणाली की, मला अपमानित करत बिग बाॅस ओटीटीमधून बाहेर काढण्यात आले. मला घरात टार्गेट केले जात होते.
-
-
जद हदीद याच्यावर टिका करत आकांक्षा पुरी म्हणाली की, तो माझा पती किंवा बाॅयफ्रेंड नाहीये, त्याला मी फिल करून किस घेण्यासाठी. किस घेतल्यानंतर जद हदीद याने आकांक्षा हिला बॅड किसर म्हटले होते.
-
-
सलमान खान हा देखील आकांक्षा पुरी हिला खडेबोल सुनावताना दिसला आहे. अनेकांनी आकांक्षा पुरी हिच्या लिपलाॅकनंतर बिग बाॅसच्या निर्मात्यांवर टिका केली होती.