अरविंद केजरीवाल यांचा बंगला कसा आहे? भाजपने जारी केले फोटो

| Updated on: May 06, 2023 | 2:23 PM

Arvind Kejriwal and BJP : भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यांवर नवीन आरोप केले आहेत. यासाठी केजरीवाल यांच्या बंगल्याचे आतील व बाहेरील फोटो भाजपने शेअर केले आहेत.

1 / 5
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भाजप यांच्यातील वाद कायम सुरु असतो. आता भाजपने अरविंद केजरीवाल यांच्यांवर नवीन आरोप केले आहेत. केजरीवाल यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानाच्या नूतनीकरणावर 45 कोटी रुपये खर्च केल्याचा भाजपचा दावा आहे.

2 / 5
दिल्ली भाजपकडून यासंदर्भात फोटो जारी केले आहेत. भाजपच्या आरोपानुसार केजरीवाल यांनी त्यांच्या निवासस्थानी कोट्यवधींचे कार्पेट्स, पडदे, मार्बल लावले आहेत. भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले करण्याची मागणी केली आहे. यामुळे तिकीट काढून सर्वसामान्य लोकांना त्यांचे 'शाही जीवन' पाहता येईल.

3 / 5
दिल्ली भाजपने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केजरीवाल यांच्या कथित आलिशान बंगल्याचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. बंगल्याच्या आतील आणि बाहेरील आधुनिक सुविधांची झलक या छायाचित्रांमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळते.

4 / 5
दिल्ली भाजपने फोटो ट्विट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "केजरीवालांच्या 'राजमहल'चे चित्र... स्वत:ला सामान्य माणूस म्हणवून घेणाऱ्याने गरिबांचा पैसा ऐषोआरामात खर्च केला, 45 कोटींचा राजमहल लक्झरीसाठी निविदा न काढता काम."

5 / 5
सरकारी घराच्या सुशोभिकरणासाठी केजरीवाल यांना 15 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याचा अधिकार होता, परंतु त्याऐवजी 45 कोटी रुपये खर्च केले आहे, असा आरोप भाजपने केला आहे.