BMW ची सर्वात शक्तीशाली कार आली, कंपनी भारतात फक्त एकच कार विकणार
BMW ने आपली सर्वात पावरफुल कार XM Label Red भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. या कारची किंमत किती आहे? या खास कारचे हाय परफॉर्मेंस फिचर्स, वैशिष्टय जाणून घेऊया.
1 / 5
BMW XM Label Red मध्ये इलेक्ट्रिक मोटरसह 4.4 लीटर V8 ट्विन टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आलय. त्यातून 748 hp पावर आणि 1000 Nm टॉर्क जनरेट होतं.
2 / 5
बीएमडब्ल्यू एक्सएम लेबल रेडमध्ये किडनी ग्रिल, विंडो आणि व्हील्सच्या आसपास ब्राइट रेड टच देण्यात आलाय. कारच्या इंटीरियरमध्ये सीट्ससाठी रेड-ब्लॅक थीम देण्यात आलीय.
3 / 5
यात 14.9 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट, 12.3 इंचाचा डिजिटल ड्रायवर डिस्प्ले, बूस्ट मोड, हेड-अप डिस्प्ले, 1475W एम्पलीफायरसह 20 स्पीकर्सची ऑडियो सिस्टम देण्यात आलीय.
4 / 5
जवळपास 2795 किलोग्रॅमची ही कार 3.7 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तास वेगाने पळू शकते. यात 25.7kWh बॅटरी पॅक देण्यात आलाय.
5 / 5
सेफ्टीसाठी या कारमध्ये एक्टिव रोल स्टेब्लिसेशन, डायनॅमिक ब्रेक कंट्रोल आणि 6 एयरबॅग सारखे फीचर्स आहेत. BMW ने अशा 500 कार बनवल्या आहेत. त्यातील फक्त एक कार भारतात विकली जाईल.