‘ॲनिमल’मधील बॉबी देओलच्या एण्ट्रीचा सीन कसा शूट झाला? डोक्यावर ग्लास ठेवण्याची कल्पना कोणाची?

| Updated on: Dec 12, 2023 | 3:20 PM

'ॲनिमल'मधील बॉबी देओलचा एण्ट्री सीनमध्ये 'जमाल कुडू' डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या गाण्यावर अनेकजण व्हिडीओ रिक्रिएट करत आहेत. मात्र बॉबी देओलचा हा सीन कसा शूट झाला हे तुम्हाला माहितीये का? एण्ट्री सीनमधील डान्सची कल्पना खुद्द बॉबीचीच होती.

1 / 6
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'ॲनिमल' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात कमाईचा 700 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. या चित्रपटातील सीन्स, डायलॉग, गाणी सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. चित्रपटातील रणबीर कपूरच्या भूमिकेसोबतच बॉबी देओलच्या भूमिकेचीही तितकीच चर्चा होत आहे.

2 / 6
बॉबी देओलच्या एण्ट्री सीनने नेटकऱ्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे. डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून नाचतानाचा बॉबी काहींना इतका आवडलाय की तोच सीन रिक्रिएट करत अनेकांनी व्हिडीओ पोस्ट केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉबीने तो सीन कसा शूट केला, याविषयी सांगितलं.

3 / 6
"त्यांनी मला आधी गाणं ऐकवलं होतं. दिग्दर्शकांना संगीताची खूप चांगली समज आहे. चित्रपट निर्मितीतील प्रत्येक गोष्टीचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी हे गाणं शोधून काढलं आणि मला म्हणाले की तुझ्या एण्ट्रीच्या सीनला बॅकग्राऊंडमध्ये हेच गाणं वाजेल", असं बॉबीने सांगितलं.

4 / 6
डान्स स्टेपबद्दल सांगताना बॉबी पुढे म्हणाला, "आम्ही शूटिंग केलं होतं आणि कोरिओग्राफरने सांगितलं की तुम्हाला जसं नाचायचं आहे तसं नाचा. मी थोडा विचार केला आणि त्या गाण्यावर नाचण्यास सुरुवात केली. तेव्हा ते म्हणाले, नाही नाही. बॉबी देओलसारखं नाचू नकोस. तेव्हा माझ्या भावाची भूमिका साकारणाऱ्या सौरभने मला डान्स स्टेप करून दाखवण्यास सांगितलं."

5 / 6
"तेव्हा मला अचानक आठवलं की मी लहान असताना आम्ही पंजाबला जायचो. तेव्हा आम्ही ग्लास डोक्यावर ठेवून खेळायचो. आम्ही असं का करायचो हे मला आजवर समजलं नाही. पण ती गोष्ट अचानक माझ्या डोक्यात आली आणि तसं मी करून दाखवलं. संदीपला तो डान्स खूपच आवडला", असं बॉबीने पुढे सांगितलं.

6 / 6
चित्रपटात बॉबी देओलला एकही डायलॉग नाही, कारण त्याने मुक्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे मध्यांतरानंतर बरीच कथा पुढे गेल्यानंतर कथेत बॉबीची एण्ट्री होते, तरीसुद्धा त्या मर्यादित वेळेत त्याने ज्या पद्धतीने भूमिका साकारली, त्याचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक होत आहे.