वनिता खरात बोल्डनेस फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे तर काहींनी काैतुकही केले आहे.
Follow us on
आज 2021 चा पहिला दिवस आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या संकल्पना आपल्या आयुष्यात करत असतो. नव्या वर्षात नवीन काही तरी करायचा प्रत्येकाचा संकल्प असतो. या नव्या संकल्पाना अभिनेत्री वनिता खरातने (Kabir Singh Actress Vanita Kharat) सुरूवात केली आहे. वनिता खरातने वर्षाच्या पहिल्याच दिवशी बोल्ड फोटो शेअर केला आहे. तिचे हे बोल्ड फोटो पाहुण अनेकांना धक्का देखील बसला आहे.
वनिता खरातने आपल्या वजनाचा न्यूनगंड न बाळतगता बोल्ड फोटो शेअर केला आहे. वनिता खरातने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना यासोबत एक पोस्टही लिहिली आहे. वनिता म्हणते की,’मला माझ्या अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीरावर अभिमान आहे. कारण मी मी आहे…!!!वनिता खरातने एका कॅलेंडरसाठी हे फोटोशूट केल्याचं दिसत आहे.
वनिताच्या फोटोसोबत नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचं कॅलेंडर असल्याचं समजत आहे. वनिता खरातचं हे फोटोशूट फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी केलं आहे. नेहमीच नऊवारी साडीमध्ये फोटो काढणाऱ्या वनिताचा अशा प्रकारचा फोटो पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
वनिता खरातची महत्वाची भूमिका राहिली ती “कबीर सिंग’ या चित्रपटात या चित्रपटात वनिताने शाहीद कपूरच्या नोकर महिलेची भूमिका साकारली आहे. मध्यंतरी वनिताने साडीवर फोटो शूट केले होते.
प्रसिध्द होण्यासाठी फक्त एकच सीनच काफी असतो हे वाक्य वनिताबद्दल खरं ठरलं आहे. एका सीन करता वनिता भरपूर पळाली पण या सीनने तिला लोकप्रियता मिळवून दिली आहे.
वनिताने ‘हास्य जत्रा’ या कॉमेडी शोमध्ये देखील धमाल उडवली आहे. वनिताने या फोटो शेअर करून एक प्रकारचा संदेशच जणू दिला आहे की, तुमचे वजन जास्त आहे म्हणून लाजण्याची कुढलीच गरज नाही तुम्ही हेही करू शकता हे वनिताने दाखवून दिले आहे.