ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री आहे. ऐश्वर्या रायची मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. नुकताच एका अभिनेत्याने आता ऐश्वर्या राय हिच्याबद्दल मोठा खुलासा केलाय.
एका जुन्या मुलाखतीमध्ये इमरान हाश्मी म्हणाला की, मी ऐश्वर्या राय हिचा खूप मोठा चाहता आहे. मी तिचा आदर देखील करतो. पुढे इमरान हाश्मीने खुलासा केला.
इमरान हाश्मी म्हणाला की, हम दिल दे चुके सन चित्रपटाच्या शूटिंगवेळी मी ऐश्वर्या राय हिच्या व्हॅनिटी व्हॅनसमोर तब्बल तीन तास थांबलो होतो.
मला ऐश्वर्या राय हिला भेटायचे होते, पण आमचे भेट होऊ शकली नाही. मी खरोखरच ऐश्वर्या राय हिचा मोठा चाहता असल्याचे त्याने म्हटले.
इमरान हाश्मीने म्हटले की, मी जेंव्हाही ऐश्वर्या राय हिला भेटेल, त्यावेळी मी तिची माफी मागणार आहे. इमरान हाश्मीने काही हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.