अभिनेता रितेश देशमुख हा सध्या चांगलाच चर्चेत दिसतोय. विशेष म्हणजे बिग बॉस मराठी सीजन 5 ला होस्ट अभिनेता करतोय.
बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का झालाय. यावेळी जान्हवी हिचा क्लास लावताना रितेश देशमुख हा दिसला. हेच नाही तर तिला खडेबोल ही सुनावले.
रितेश देशमुख जान्हवी किल्लेकरला म्हणाला की, मागच्या आठवड्यातही तू माफी मागितली आणि रडली. मात्र, मला आता असा संशय आहे की, तू तेही नाटक करत होती.
तू फक्त माफी मागण्याची अॅक्टिंग करत होती. आता ही अॅक्टिंग बस करा...असेही म्हणताना रितेश देशमुख हा दिसलाय.
आता पुढील काही दिवस जान्हवी किल्लेकर हिला बिग बॉसच्या जेलमध्येच राहवे लागणार आहे. जान्हवीने पॅडी कांबळेबद्दल हैराण करणारे विधान केले होते.