गेल्या काही वर्षांपासून ऐश्वर्या बॉलिवूडपासून दूर आहे. पण एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त ऐश्वर्या रायची आणि तिच्या सौंदर्याची चर्चा रंगलेली होती. 90 च्या दशकात ऐश्वर्या हिचा सर्वत्र बोलबाला होता.
आता ऐश्वर्या 51 वर्षांची झाली आहे. पण अभिनेत्रीचे जुने फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वयाच्या 21 वर्षी ऐश्वर्याने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं.
आजही ऐश्वर्याच्या मॉडेलिंगच्या काळातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मॉडेलिंगनंतर ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं. आजही अभिनेत्रीच्या सिनेमांची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते.
अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांसोबत ऐश्वर्याने स्क्रिन शेअर केली आहे. पण आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. पण कोणत्याही कार्यक्रमात अभिनेत्री लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचते.
ऐश्वर्या वयाच्या 51 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सोशल मीडियावर देखील ऐश्वर्या स्वतःचे फोटो पोस्ट करते. पण इतर सेलिब्रिटींप्रमाणे अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय नसते.