‘तेव्हा गोष्टी एका मर्यादेबाहेर….’, कॅमेरामन्सच्या चुकीच्या अँगलबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली….
तिने हे सुद्धा मान्य केलं की, पापराजीच घर यावरच चालतं. ते सुद्धा भीषण गर्मीमध्ये काम करुन आपलं घर चालवतात. नेहाची वेब सीरीज 'इलीगल'चा तिसरा सीजन नुकताच रिलीज झालाय. आता ती सोनी लिवची वेब सीरीज '36 डेज' मध्ये दिसणार आहे.
-
-
बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. पापाराझीच्या कॅमेऱ्यांची नेहमीच तिच्यावर नजर असते. तिने म्हटलय की, यामुळे खासगी आयुष्य राहत नाही.
-
-
नेहा शर्माने इमरान हाशमीच्या अपोजिट ‘क्रूक’ चित्रपटातून डेब्यु केला होता. ‘तुम बिन 2’, ‘तानाजी’ चित्रपटात तिने काम केलय. ‘इलीगल’ या वेब सीरीजमध्ये सुद्धा ती होती.
-
-
सोशल मीडियावर ती लोकप्रिय आहे. नेहाच्या ग्लॅमरस अवताराची सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते. पापाराझीचे कॅमेरे नेहमीच तिला लेन्समध्ये कैद करतात.
-
-
सतत कॅमेरा मागे असल्यामुळे व्यक्तीगत आयुष्य राहत नाही. असेही काही दिवस असतात जेव्हा तुम्हाला कॅमेऱ्यासमोर दिसायच नसतं असं नेहा इंडिया टुडेशी बोलताना म्हणाली.
-
-
पापाराजींच्या चुकीच्या अँगलबद्दल बोलताना नेहा म्हणाली की, ‘एक महिला म्हणून कसं तयार व्हायच हे तुमच स्वातंत्र्य निघून जातं’. “तुम्ही लोकांसमोर असता, तेव्हा गोष्टी एका मर्यादेबाहेर जाणार नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यावी लागते” असं नेहा म्हणाली.