बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान तिची आई अमृता सिंगसोबत हॉलिडे इन्जॉय करतेय. महाकालेश्वर जोतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी ती आपल्या आईसोबत गेली आहे.
Ad
सारा अली खान आणि अमृता सिंह
Follow us on
बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान तिची आई अमृता सिंगसोबत हॉलिडे इन्जॉय करतेय. महाकालेश्वर जोतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी ती आपल्या आईसोबत गेली आहे.
साराने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर तिची आई अमृता सिंगने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. कोरोनाचे नियम पाळत यात त्या दोघींनीही मास्क घातला आहे.
सारा आपल्या घरच्यासोबत नेहमी फिरायला गेलेली दिसते. तसे फोटो ती तिच्या सोशल मीडियावर शेअर करते. आई आणि भाऊ इब्राहिमसोबचे काही फोटो ही साराने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
साराने आपले वडील सैफ अली खानच्या वाढदिवसाच्या दिवशी एक फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या होत्या. यात करिना कपूर, सैफ आणि करिनाचा लहान मुलगा दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती तिच्या बाबांसोबत दिसतेय.
ईदच्या दिवशी साराने सैफ अली खान आणि आपल्या भावंडांसोबत फोटो शेअर केले होते. याला तिने ‘ईद मुबारक’ असं कॅपशन दिलं होतं. या फोटोत तैमुरदेखील दिसत आहे.