एकेकाळी वडील समोसा विकायचे, आज प्रसिद्ध गायिका, वाचा नेहाची संघर्षगाथा

| Updated on: Apr 02, 2024 | 10:17 PM

आयुष्यात संघर्ष हा प्रत्येकाच्या पाचवीला पुजलेला असतो. प्रत्येकाला संघर्षातून तापून सुलाखून बाहेर पडावं लागतं. पण या संघर्षाच्या काळात डगमगून न जाता परिस्थितीचा लढा दिला तर आपल्याला यश नक्कीच मिळतं. बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड हे याचं चांगलं उदाहरण आहे. नेहाचे वडील एकेकाळी शाळेच्या बाहेर समोसा विकायचे. पण नेहाने आपल्याल कलेवर विश्वास ठेवत मेहनत केली. आज नेहा कक्कड बॉलिवूडमधील सर्वात नामांकीत आणि यशस्वी गायकांपैकी एक आहे.

1 / 5
नेहा कक्कड हिचा जन्म 6 जून 1984 ला झाला होता. नेहाच्या आईचं नाव नीती तर पित्याचं नाव ऋषिकेश कक्कड असं आहे. नेहाने वयाच्या चौथ्या वर्षीचं गाणं गायला सुरुवात केली होती. नेहा आपल्या मोठ्या बहिणीसोबत भाजन गायची. यानंतर नेहा आपल्या कुटुंबियांसोबत दिल्लीला वास्तव्यास गेली.

2 / 5
नेहा कक्कडने न्यू होली पब्लिक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं. नेहाला शाळेत 'इंडियन आयडल'मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. नेहा 2006 मध्ये इयत्ता अकरावीत असताना 'इंडियन आयडल'मध्ये सिलेक्ट झाली होती. पण ती स्पर्धेतून बाद झाली होती.

3 / 5
नेहा त्यावेळी इंडियन आयडलच्या फायनलपर्यंत पोहोचली होती. पण ती जिंकली नव्हती. पण तरीही नेहा कक्कड खचली नाही.

4 / 5
नेहा कक्कडने 2008 मध्ये स्वत:चा नेहा द रॉक स्टार म्हणून अल्बम लॉन्च केला. त्यानंतर नेहाला 'कॉकटेल' चित्रपटासाठी गाणं गाण्याची संधी मिळाली. नेहाने या चित्रपटात सेकंड हँड जवानी हे गाणं गायलं. हे गाणं चागलंच हिट ठरलं. पण ती 'यारियां' चित्रपटातील 'सनी-सनी' या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली.

5 / 5
एकेकाळी इंडियन आयडलचं फायनल न जिंकू शकलेली नेहा आज त्याच कार्यक्रमात परिक्षक आहे. यापेक्षा मोठं यश काय असू शकतं? नेहाला तिच्या यूट्यूब चॅनलवर जवळपास दीड कोडी सब्सक्रायबर्स आहेत.