अमिताभ बच्चन यांनी 30 मार्च रोजी त्यांच्या ब्लॉगवर AI ची छायाचित्रे पोस्ट केली. 30 मार्च रोजी ते चाहत्यांना भेटले होते, चाहत्यांचा हा भेटीचा क्षण बिग बी यांनी GHIBLI ART मध्ये रूपांतरित केला आहे. हे फोटो पोस्ट करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, Ghibli ही एक नवीन लोकप्रिय संकल्पना आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने गेल्या वर्षी निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानीशी लग्न केले. रकुल प्रीतने GHIBLI आर्टचा वापर करून तिच्या लग्नाच्या फोटोला नवा रंग दिला आहे.
अभिनेत्री बिपाशा बसूने 2016 साली करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केले. तर 2022 मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला. बिपाशाने अलीकडेच GHIBLI वरून तिचा फॅमिली फोटो तयार केला. या फोटोमध्ये बिपाशा, मुलगी देवी आणि पती करण सिंग ग्रोव्हर खूपच क्यूट दिसत आहेत.
अभिनेत्री परिणीती चोप्राला देखील GHIBLI ची भुरळ पडली आहे. तिने या फीचरच्या मदतीने तिचे आणि पती राघव चढ्ढा यांच्या लग्नाचे फोटो आणखी सुंदर केले आहेत. Ghibli फीवर - अशी कॅप्शन तिने लिहीली आहे.
अभिनेता अर्जुन कपूरने 'सिंघम अगेन' चित्रपटातील डेंजर लंका हे पात्र GHIBLI इफेक्टमध्ये बदलले आणि तोही या ट्रेंडमध्ये सामील झाला. अर्जुन कपूरने हा फोटो शेअर केला.
बॉलिवूड चित्रपट 'भूतनी'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या चित्रपटात सुपरस्टार संजय दत्त मुख्य भूमिकेत असून तो एक मल्टीस्टारर चित्रपट आहे. चित्रपटात भुताची भूमिका साकारणाऱ्या मौनी रॉयनेही चित्रपटातील तिचा एक सीन GHIBLI इफेक्टमध्ये बदलून शेअर केला आहे.
या नव्या ट्रेंडमध्ये शनाया कपूरनेही उडी मारत फोटो शेअर केलेत. विशेष बाब म्हणजे तिने तिच्या 'आँखों की गुस्ताखियां' या पहिल्याच चित्रपटच्या सेटवरील फोटोचे रूपांतर घिबली आर्टमध्ये केले आहे. या फोटोत अभिनेत्रीने चित्रपटाचा क्लिपबोर्ड पकडलेला दिसत आहे.