Marathi News Photo gallery Bollywoods divorce Aamir Khan Reena Dutta Karisma Kapoor Sanjay Kapur Saif Amrita Singh Malaika Arbaaz Khan know alimony amount
बॉलिवूडमधील महागडे घटस्फोट; पोटगी म्हणून एकाने दिले 380 कोटी रुपये तर दुसऱ्याने दिला बंगला
बॉलिवूडमध्ये आजवर अनेक हाय-प्रोफाइल ब्रेकअप आणि घटस्फोट पहायला मिळाले. सैफ अली खान-अमृता सिंहपासून ते मलायका अरोरा-अरबाज खान यांच्यापर्यंत अनेक जोड्या त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत होत्या. या घटस्फोटानंतर त्यांना पोटगी म्हणून किती रक्कम मिळाली, ते पाहुयात..
1 / 5
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानने 2000 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या 14 वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. हृतिक आणि सुझान यांना रेहान आणि रिधान ही दोन मुलं आहेत. या दोघांचा घटस्फोट हा बॉलिवूडमधील सर्वांत महागडा घटस्फोट असल्याचं म्हटलं जातं. सुझानने हृतिककडे 400 कोटी रुपये पोटगीची मागणी केली होती. अखेर हृतिकने तिला 380 कोटी रुपये दिल्याचं म्हटलं जातं.
2 / 5
आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची प्रेमकहाणी 1980 मध्ये सुरुवात झाली होती. 1986 मध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केलं, तेव्हा आमिर फक्त 21 आणि रिना 19 वर्षांची होती. 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यावेळी आमिरने रिनाला 50 कोटी रुपये पोटगी दिली होती.
3 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 12 डिसेंबर 1998 मध्ये लग्न केलं होतं. 2017 मध्ये हे दोघं विभक्त झाले. घटस्फोटानंतर मलायकाला 10 ते 15 कोटी रुपये पोटगी मिळाल्याचं म्हटलं जातं.
4 / 5
अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांनी 1991 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या 13 वर्षांनंतर 2004 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. एका मुलाखतीत सैफने सांगितलं होतं की त्याला अमृताला 5 कोटी रुपये पोटगीची रक्कम द्यायची होती. त्यापैकी अडीच कोटी रुपये त्याने दिले होते आणि मुलगा इब्राहिम खान 18 वर्षांचा होईपर्यंत त्याला महिन्याला एक लाख रुपये द्यायचे होते.
5 / 5
अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर याने लग्नाच्या 17 वर्षांनंतर अधुना भबानीला घटस्फोट दिला होता. 2017 मध्ये हे दोघं विभक्त झाले होते. घटस्फोटानंतर फरहानने तिला ठराविक रक्कम आणि 10,000 चौरस फूटांमध्ये पसरलेला बंगला दिला. मुंबईतील बँडस्टँड परिसरात हा बंगला आहे.