BUDGET 2022 : तोच दिवस, तीच वेळ, अर्थसंकल्पाचं ब्रिटिश कनेक्शन; वाचा रंजक माहिती
केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या अंतिम दिवशी पाच वाजता सादर करण्यामागे ऐतिहासिक कारणही दडलं आहे. ब्रिटिश संसदेत दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प मांडला जात असे. मात्र 200 सालापासून भारतामध्ये या नियमांत बदल करण्यात आला.
1 / 7
अर्थसंकल्पासाठी इंग्रजीत बजेट हा शब्द प्रचलित आहे. बजेट हा शब्द फ्रेंच (Bougette) म्हणजे पर्स,पिशवी या शब्दापासून आलेला आहे. अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक नियोजन. अर्थसंकल्पाचा इतिहास 180 वर्ष जुना आहे. 7 एप्रिल 1860 मध्ये भारताचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश सत्तेच्या काळात सादर केला होता. जॉन मथाई यांनी भारतीय गणराज्यासाठीचा पहिला अर्थसंकल्प 1950 साली सादर केला.
2 / 7
भारतात केंद्रीय अर्थमंत्री दर वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतात. यंदाच्या वर्षी 1 फ्रेब्रुवारी 2022 रोजी निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील. मात्र, सुरुवातीच्या काळात फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवशी अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा होती.
3 / 7
4 / 7
केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या अंतिम दिवशी पाच वाजता सादर करण्यामागे ऐतिहासिक कारणही दडलं आहे. ब्रिटिश संसदेत दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प मांडला जात असे. मात्र, भारतात सायंकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल. यामागे दडलं होतं वेळेचं कनेक्शन.
5 / 7
भारतात जेव्हा सायंकाळचे पाच वाजलेले असतात. तेव्हा ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये घड्याळात सायंकाळी 11.30 होतात. लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमर्समध्ये भारतीय अर्थसंकल्पाचं भाषणं ऐकलं जातं
6 / 7
Budget-2022
7 / 7
एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ बदलण्यात आली. संविधान लागू केल्याच्या 50 वर्षाच्या नंतर प्रथा बदलण्यात आली. वर्ष 2000 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला. भारतीय संकेतानुसार आणि वेळेनुसार अर्थसंकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.