पत्ता कोबीमध्ये असते दूधाइतकेच कॅल्शिअम; जाणून घ्या 5 महत्त्वाचे फायदे
पत्ता कोबी ही भाजी जवळपास सर्वांनाच माहित आहे. भाजीसोबतच पत्ता कोबीचा वापर हा सलाद, सूप आणि चायनीज पदार्थांमध्येही केला जातो. पत्ता कोबीच्या सेवनामधून तुम्हाला दुधाइतकेच लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियम मिळते. त्यामुळे तज्ज्ञाकडून या कोबीचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण पत्ता कोबीचे फायदे जाणून घेणार आहोत.
1 / 5
कोबीमध्ये दुधाइतकेच कॅल्शियम असते. ज्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात. अनेकांना दूध प्यायला आवडत नाही, तर काहींना दूध प्यायला चालत नाही. अशा परिस्थितीमध्ये पत्ता कोबीचे सेवन केल्यास दुधामधूम मिळणाऱ्या पोषण द्रव्याची कमतरता भरून निघते. जर तुम्हाला हाडांशी संबंधित समस्या असतील तर आहारात कोबीचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
2 / 5
जर तुम्हाला सतत स्नायू दुखीचा त्रास होत असेल तर कोबीच्या सेवनाने स्नायू दुखीचा त्रास देखील दूर होतो. कोबीमध्ये लॅक्टिक अॅसिड नावाचा एक घटक असतो. त्यामुळे कोबी हा एक उत्तम प्रकारचा नैसर्गिक वेदनाशामक ठरते.
3 / 5
पोटाच्या समस्यांवरही कोबी एक चांगला पर्याय आहे. कोबीच्या नियमित सेवनामुळे पचनशक्ती वाढते, तसेच पोटदुखीचा त्रास दूर होतो. पोटातील जंतांची समस्याही कोबीच्या सेवनाने दूर होते.
4 / 5
कोबीमध्ये लोह आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे कोबी हा शरीरातील रक्ताची कमतरता दूर करून, रक्त शुद्ध करण्यास देखील मदत करतो. पोटॅशियम बीपी आणि हृदयाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
5 / 5
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी कोबीचा आहारात समावेश करावा. शिजवलेल्या कोबीमध्ये फक्त 33 कॅलरीज असतात, ज्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर ऊर्जा देखील मिळते आणि शरीरात चरबी देखील जमा होत नाही. तुम्ही या कोबीचा उपयोग सलाद म्हणून देखील करू शकता.