Car Service : पावसाच्या सीजनमध्ये कार सर्विसिंग करावी की, थोडी वाट पाहवी?
Car Service : पावसात कार सर्विसिंग करावी की नाही? असा अनेकांना प्रश्न पडतो. पावसात पाणी, चिखल आणि घाणीमुळे इंजिन, ब्रेक आणि दुसऱ्या भागांवर परिणाम होतो.
1 / 5
ब्रेक्स आणि टायर : कारला घसरण्यापासून वाचवण्यासाठी ब्रेक्स आणि टायरची स्थिती चांगली हवी. म्हणून सर्विस करताना त्यांची तपासणी करुन घेतली पाहिजे.
2 / 5
वायपर आणि विंडस्क्रीन : पावसात समोरच स्पष्ट दिसणं आवश्यक आहे. यासाठी वायपर ब्लेड्स आणि विंडस्क्रीनची चेकिंग करुन घ्यावी.
3 / 5
इलेक्ट्रिकल सिस्टम : पाण्यामुळे इलेक्ट्रिकल सिस्टमवर प्रभाव पडू शकतो. म्हणून बॅटरी, लाइट्स आणि अन्य इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स चेक करुन घ्यावेत.
4 / 5
अंडरबॉडी प्रोटेक्शन : पावसाच्या पाण्यामुळे कारच्या अंडरबॉडीच नुकसान होऊ शकतं. म्हणून ते स्वच्छ आणि प्रोटेक्टेड ठेवणं आवश्यक आहे.
5 / 5
एयर फिल्टर आणि इंजिन ऑयल : पावसात जास्त ओलावा असल्याने एयर फिल्टर आणि इंजिन ऑईल तपासलं पाहिजे. एकूणच पावसात कार सर्विस करुन घेणं फायद्याच ठरतं, कारण तुम्ही सुरक्षित प्रवास करु शकता.