Carrot Benefits: हिवाळ्यात रोज एक गाजर खा, पाहा किती आजार पळणार लांब
Carrot Benefits for health: हिवाळ्यात मुबलक प्रमाणात बाजारात गाजर येतात. या दिवसांत गाजर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गाजर खाण्याचे अनेक फायदे आहेत. गाजर आरोग्यदायी आहे. त्यात शरीरासाठी आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व आहेत.
1 / 5
गाजरच्या भाजीसोबत गारजचा हलवा, लोंच, मुरब्बा, पाक, सलाद, ज्यूस असे विविध प्रकाराच्या माध्यमातून गाजर खाता येतो. गाजरमध्ये मुबलक प्रमाणात बीटा कॅरोटीन आणि एंटीऑक्सीडेंट आहे. अर्धा कप गाजरमध्ये 25 ग्रॅम कॅलरीज, 6 ग्रॅम कार्बोहाइड्रेट, 2 ग्रॅम फायबर, 3 ग्रॅम साखर आणि 0.5 ग्रॅम प्रथिने असतात.
2 / 5
गाजरात बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते. हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे गाजर खाल्याने वाढत्या वयामुळे डोळ्यांच्या निर्माण होणाऱ्या आजारांपासूनही सुटका मिळते. बीटा-कॅरोटीनसोबतच व्हिटॅमिन सी देखील गाजरात मुबलक प्रमाणात आहे.
3 / 5
गाजरात आढळणारे कॅरोटीन नावाचे पोषक तत्व रातांधळेपणाच्या समस्येपासून सुटका मिळते. गाजरचे सेवन केल्यामुळे ह्रदयाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे ह्रदयविकार होण्याचा धोका कमी होतो. गाजरात आढळणारे पोटॅशियम हे खनिज शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित करते.
4 / 5
रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास गाजर मदत करतो. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. गाजर खाल्ल्याने शरीरातील अँटिऑक्सिडंट्सचा प्रभाव वाढू शकतो.
5 / 5
गाजरामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे शौचाची समस्या निर्माण होत नाही. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. याशिवाय ते अन्न पचण्यासही उपयुक्त आहे. गाजर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.