98 दिवस ‘बिग बॉस 18’मध्ये राहिलेल्या चाहत पांडेनं कमावले तब्बल इतके लाख रुपये..

| Updated on: Jan 14, 2025 | 12:53 PM

बिग बॉसच्या घरात जवळपास 98 दिवस राहिलेल्या चाहत पांडेनं चांगलीच कमाई केली आहे. तिला प्रत्येक आठवड्याला किती मानधन मिळायचं आणि आतापर्यंत तिने किती रुपये कमावले, त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात..

1 / 5
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे 'बिग बॉस 18'च्या बाहेर पडली आहे. ग्रँड फिनालेच्या काही दिवस आधीच चाहतचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. या आठवड्यात दोन स्पर्धक घराबाहेर पडले. आधी श्रुतिका आणि त्यानंतर आता चाहतला एलिमिनेट करण्यात आलं.

2 / 5
चाहत पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरात आणि सोशल मीडियावर चर्चेत होती. तिच्या खासगी आयुष्यावरून बरीच कॉन्ट्रोव्हर्सीसुद्धा झाली. चाहत बिग बॉसच्या घरात जवळपास 98 दिवस राहिली.

3 / 5
चाहत 14 आठवड्यांपर्यंत या शोमध्ये होती. 'बिग बॉस 18'च्या घरात चाहतने कोणासोबतच गट केला नाही. ती एकटीच खेळली. कदाचित यामुळेही तिला घराबाहेर पडावं लागल्याचं म्हटलं जात आहे.

4 / 5
या 98 दिवसांत चाहतने चांगली कमाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, चाहतला प्रत्येक आठवड्यासाठी एक ते दोन लाख रुपये मानधन मिळायचं. त्यानुसार आतापर्यंत तिने 14 ते 28 लाख रुपयांची कमाई केली आहे.

5 / 5
'बिग बॉस 18'चा ग्रँड फिनाले येत्या 19 जानेवारी रोजी पार पडणार आहे. सध्या घरात करणवीर मेहरा, विवियन डिसेना, चुम दरांग, शिल्पा शिरोडकर, अविनाश मिश्रा, ईशा सिंह आणि रजल दलाल हे स्पर्धक राहिले आहेत.